शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

मुस्लीम मुलांचे मराठी शिक्षण वाऱ्यावर

By admin | Updated: December 22, 2016 00:09 IST

मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये ‘मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग’ सुरू करण्यात आले आहे.

शिक्षकांना नाही मानधन : विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याकडे दुर्लक्ष यवतमाळ : मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये ‘मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग’ सुरू करण्यात आले आहे. मात्र, यासाठी कार्यरत मानसेवी शिक्षकांना तब्बल पाच महिन्यापासून मानधनच देण्यात आले नाही. तर दुसरीकडे शासनाचे निर्देश असूनही विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षाही घेतली नाही. उर्दू माध्यमातून संपूर्ण शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना पुढे स्पर्धा परीक्षा देताना मराठी विषय अवघड ठरतो. त्यामुळे उर्दू शाळांमध्ये मराठीचे अध्यापन करण्याची मागणी काही संघटनांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये ‘मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग’ ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. परंतु, पुरेसा प्रचार न झाल्याने जिल्ह्यातील सर्वच उर्दू शाळांचा यात सहभाग नाही. केवळ ३० शाळांमध्ये हा वर्ग चालविला जात आहे. आठवी, नववी आणि दहावीतील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविण्यासाठी ३४ मानसेवी शिक्षकांची नेमणूक जुलैमध्ये करण्यात आली. मात्र त्यांचे मासिक ५ हजार रुपयांचे मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही. गेल्या शैक्षणिक सत्रापर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेली ही योजना चालू सत्रापासून निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविली जात आहे. शिवाय, मानसेवी शिक्षकांचे मानधन पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित होते. ते आता थेट प्रौढ शिक्षण संचालनालयाच्या संचालकांच्या (पुणे) अखत्यारित आहे. मराठी फाऊंडेशन वर्गातील विद्यार्थ्यांची दर तिमाहीत चाचणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. परंतु, जिल्ह्यात ५ महिने उलटूनही ही परीक्षाच घेण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत कुठलीही आकडेवारी निरंतर शिक्षणाधिकारी स्तरावर उपलब्ध नाही. (स्थानिक प्रतिनिधी)