शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बायको पळविल्याच्या रागातून युवकाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:45 IST

वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीला जवळच्या मित्रानेच फूस लावून पळविले. याचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याला ठार केले. ही थरारक घटना यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथे घडली.

ठळक मुद्दे पत्नी समक्षच केले ठारभोयर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीला जवळच्या मित्रानेच फूस लावून पळविले. याचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याला ठार केले. ही थरारक घटना यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथे घडली. यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.रंगराव श्रावण घोटेकर (३५) रा.चाणी असे आरोपीचे नाव आहे. रंगरावने वर्षभरापूर्वी लग्न केले होते. त्याच्या पत्नीला त्याचा जवळचा मित्र असलेल्या गणेश शंकर टेकाम (३४) याने पळवून नेले. तो रंगरावच्या पत्नीसह भोयर येथे राहात होता. या घटनेपासून रंगरावच्या मनात प्रचंड राग होता. मंगळवारी सायंकाळी रंगरावने गणेशच्या घरी येऊन त्याच्यासोबत वाद घातला. यावेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. पत्नी सोबत येत नाही हे पाहून चिडलेल्या रंगरावने गणेशला जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली व निघून गेला.

मध्यरात्री १ वाजता रंगरावने झोपडीवजा घरात शिरून गणेशवर झोपेतच हल्ला चढविला. त्याच्या छातीवर लाथाबुक्क्यांचे जबर प्रहार केले. गणेशला वाचविण्यासाठी भाग्यश्री धावून आली. मात्र रंगराव जुमानला नाही. यातच गणेशचा जागीच मृत्यू झाला. नंतर रंगराव घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी भाग्यश्रीने दिलेल्या तक्रारीवरून रंगरावविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार संजय शिरभाते यांनी आरोपी रंगरावला चाणी(कामठवाडा) येथून गुरुवारी ताब्यात घेतले. त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी