शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयातून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

लक्ष्मण मसू जाधव (५५), रा. वाघाडी असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा गवंडीकाम करून कुटुंबाचा गाढा हाकत होता. त्याचा मुलगा, सून परिसरातीलच ढाब्यावर कामाला होते. एकाच समाजाची वसाहत वाघाडी परिसरात आहे. तेथेच लक्ष्मण राहत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण हा जादूटोणा करतो, मूठ मारतो, यामुळे माणसाचा मृत्यू होतो, असा समज पसरला होता. समाजातील काही जण त्याचा रागाराग करू लागले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंधश्रद्धा डोक्यात भिनल्यावर काय होऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री आला. वाघाडी पोड येथे मोलमजुरी करून राहणाऱ्या वृद्धावर काही जणांनी जादूटोण्याचा संशय व्यक्त केला. कुटुंबातील दोघांचा मृत्यू मूठ मारल्याने झाल्याचा समज करून घेत वृद्धावर चाकूने सपासप वार केले. ही घटना आर्णी मार्गावर होमगार्ड समादेशक कार्यालयातील मैदानात घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह एका युवकाला अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण मसू जाधव (५५), रा. वाघाडी असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा गवंडीकाम करून कुटुंबाचा गाढा हाकत होता. त्याचा मुलगा, सून परिसरातीलच ढाब्यावर कामाला होते. एकाच समाजाची वसाहत वाघाडी परिसरात आहे. तेथेच लक्ष्मण राहत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण हा जादूटोणा करतो, मूठ मारतो, यामुळे माणसाचा मृत्यू होतो, असा समज पसरला होता. समाजातील काही जण त्याचा रागाराग करू लागले होते. देवकार्याच्या कार्यक्रमातून आठ दिवसांपूर्वी लक्ष्मणला हुसकावून लावण्यात आले होते. या भीतीपोटी लक्ष्मण घराकडे जाताना रस्ता बदलवित होता, तो नेहमीच होमगार्ड समादेशक कार्यालयातील मैदानातून घराकडे जात होता. लक्ष्मणने जादूटोणा केल्यामुळे गाेविंद शेळके व विनोद शेळके यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्यावर होता. त्यामुळेच शेळके कुटुंबातील अल्पवयीन तसेच अभय सुदाम नैताम (१८), रा. वाघाडी हे तिघे वचपा काढण्याच्या तयारीत होते. घटनेच्या दिवशी लक्ष्मण नेहमीप्रमाणे मोलमजुरी करून भाजीपाला घेऊन घराकडे जात होता. दरम्यान, हल्लेखोर आर्णी मार्गावरील पेट्राेलपंपावर पेट्रोल भरत होते. तेथूनच त्यांनी लक्ष्मणचा पाठलाग सुरू केला. अंधारात एकट्याला गाठून लक्ष्मणवर चाकूने सपासप वार करण्यात आले. घराजवळच काही अंतरावर तो कोसळला. आरोपी तेथून पसार झाले. लक्ष्मण जाधव यांची सून मीनाक्षी हिला लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. तिने ही घटना धावत जाऊन पतीला सांगितली. युवराज लक्ष्मण जाधव याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, प्रभारी एसडीपीओ प्रदीप पाटील घटनास्थळी पोहोचले. अवधूतवाडी पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेणे सुरू केले. खुनाचे कारण उघड होताच तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. यातील अभय नैताम याने गुन्ह्याची कबुली दिली. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल सेजव यांच्याकडे देण्यात आला आहे. साहेब, तो मावशीचे मूलही मारत होता- लक्ष्मण जाधव जादूगार होता, त्याने मूठ मारली की माणूस मरून जात होता. यामुळेच त्याला खतम केले, त्याने आमच्या घरचे दोन जीव घेतले. आता तो माझ्या मावशीच्या लहान मुलांनाही मारेल, अशी भीती होती. म्हणूनच, त्याला संपविल्याची कबुली विधिसंघर्षग्रस्त बालकांनी अवधूतवाडी पोलिसांकडे दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस