शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी नांदायला येत नसल्याने सासऱ्याचा केला खून; आरोपी जावयाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 17:23 IST

वयले यांच्या मुलीने राजेश सुधाकर शिवणकर (२९) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. राजेश सुरुवातीचे काही दिवस चांगला राहिला, नंतर तो दारूच्या आहारी गेला. पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला.

बाभूळगाव (यवतमाळ) : प्रेमविवाह केल्यानंतर पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तिला माझ्यासोबत नांदायला का पाठवत नाही, याचा राग मनात धरून जावयाने वृद्ध सासऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

विश्राम बिसन वयले (५५), रा. टिटवा, ता. चांदूररेल्वे, असे मृताचे नाव आहे. वयले यांच्या मुलीने राजेश सुधाकर शिवणकर (२९) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. राजेश सुरुवातीचे काही दिवस चांगला राहिला, नंतर तो दारूच्या आहारी गेला. पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. या जाचाला कंटाळून राजेशची पत्नी वडील विश्राम वयले यांच्या घरी राहायला आली. राजेश पत्नीला सोबत चलण्यासाठी तगादा लावत होता. विश्राम वयले यांनी मुलीला पतीकडे जाण्यास परवानगी दिली नाही.

विश्राम वयले हे बाभूळगाव तालुक्यातील पिंपळखुटा शिवारातील आशुतोष गुल्हाने यांच्या शेतावर कामाला होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे विश्राम वयले शेतात गेले. ते घरी परत आले नाहीत, त्यामुळे त्यांचा मुलगा शंकर शोधण्यासाठी शेतात गेला. तेव्हा विश्राम मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचे दिसत होते. याची तक्रार शंकरने बाभूळगाव पाेलीस ठाण्यात दिली. जावई राजेश शिवणकर यानेच वडिलांचा खून केला असे त्याने तक्रारीत नमूद केले.

याप्रकरणी ठाणेदार रवींद्र जेधे यांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी राजेशला अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली. या ठिकाणी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार