शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

महागाव येथे जुन्या वैमनस्यातून नायब तहसीलदारांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

फोटो महागाव : येथील तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) मोहन पेंदुरकर (५९) यांचा त्यांच्याच ...

फोटो

महागाव : येथील तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) मोहन पेंदुरकर (५९) यांचा त्यांच्याच भाच्याने जुन्या वैमनस्यातून खून केला. आरोपीला पोलिसांनी यवतमाळातून अटक केली आहे.

पवन श्रीराम मंगाम (३३, रा. लोहारा, यवतमाळ) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. मृत मोहन पेंदुरकर हे यवतमाळ येथील विश्वशांतीनगरचे रहिवासी होते. गुरुवारी रात्री फुलसावंगीनजीक पिंपळगाव फाटा येथे त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यावरून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर हा खूनच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार विलास चव्हाण यांच्या सतर्कतेने आरोपीला केवळ चार तासांमध्ये अटक करण्यात आली.

पवन मंगाम याच्या कुटुंबासोबत पेंदूरकर यांचा जुना वाद होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी पवन गेल्या काही दिवसांपासून मामाची हत्या करण्याची संधी शोधत होता. मामा मदत करीत नसल्याने त्यांचा काटा काढण्याची योजना त्याने तयार केली होती. गुरुवारी सायंकाळी पवन हा महागाव येथे मोहन पेंदुरकर यांच्याकडे तहसील कार्यालय परिसरातील शासकीय निवासस्थानी आला होता. मामाने काही दिवसांपूर्वी घेतलेली जुनी कार (एम.एच. २० सी.एच. ०८४०) शिकविण्याच्या बहाण्याने ते दोघेही ५.३० वाजता महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर गेले. पिंपळगाव फाटा येथे या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी पवनने सोबत आणलेल्या कैचीने मामाच्या छाती आणि डोक्यात सपासप वार केले. त्यामुळे पेंदुरकर जागीच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. ते मृत झाल्याची खात्री होताच आरोपीने सरळ यवतमाळ येथे पोबारा केला होता.

बॉक्स

तातडीने फिरविली तपास चक्रे

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी तातडीने चक्रे फिरविली. प्रथम पेंदुरकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता पसरली होती. मात्र, घटनास्थळावर कोणतेही वाहन आढळून आले नाही. सवना येथे पेंदुरकर यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच १० वाजता आरोपीला यवतमाळ येथून कारसह अटक करण्यात आली. रात्री १ वाजता त्याला महागाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीने खुनाची कबुली दिल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध भादंवी ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी सांगितले.