शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचीही आंतरजिल्हा बदली होणार, जिल्ह्याबाहेरचे अधिकार विभागीय आयुक्तांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 05:30 IST

transfer News : राज्यात ३७० नगरपरिषदा आहेत. पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफारशीने झाल्याचे मानले जाते. कुणीतरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते पालिकेच्या सेवेत आलेले असतात.

यवतमाळ : नियुक्ती ते सेवानिवृत्ती एकाच नगरपरिषदेत ही परंपरा आता खंडित होणार असून, या कर्मचाऱ्यांचीही आता आंतरजिल्हा बदली होणार आहे. जिल्ह्यांतर्गत बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर जिल्ह्याबाहेरचे अधिकार  विभागीय आयुक्तांना देण्यात  आले आहेत. ३ डिसेंबर, २०२० रोजी  हा आदेश काढण्यात आला  आहे.राज्यात ३७० नगरपरिषदा आहेत. पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफारशीने झाल्याचे मानले जाते. कुणीतरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते पालिकेच्या सेवेत आलेले असतात. त्यांचा हात पाठीवर राहात असल्याने अशा कर्मचाऱ्यांची मनमानी वाढते. याचा परिणामी कामकाजावर होतो. हीच बाब ध्यानात घेत, बदलीचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.काही कर्मचारी तर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही, असा एखादा कर्मचारी जुमानत नसल्यास त्याच्या बदलीचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांनी सादर करताच तडकाफडकी बदली आदेश  काढले जाणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या पालिकेत बदली करायची झाल्यास, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याकडे तर जिल्ह्याबाहेरच्या पालिकेत बदलीसाठी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव द्यावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार बदली मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांचा कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक या निर्णयामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम लागणार आहे. असे असले, तरी काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याचीही भीती आहे. आपल्या मर्जीतील लोकांना सांभाळण्यासाठी दुसऱ्याला हटविण्यासाठीही या आदेशाचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काळात या बदली आदेशाचा वापर कसा केला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीTransferबदली