लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेतील १३७४ कर्मचाऱ्यांनी राज्य व्यापारी आंदोलनाला पाठिंबा देत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कर्मचाºयांप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी हा लढा सुरू आहे.राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान काळ्या फिती लावून कामकाज केले. त्यानंतरही शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संघर्ष समितीने जाहीर केलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वर्षाचा पहिला दिवसच पालिकेतील कामकाज बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. आंदोलनात यवतमाळ पालिकेसह उमरखेड, दारव्हा, दिग्रस, पुसद, वणी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी व नेर नगरपालिका आणि नगरपंचायतींचे कर्मचारी सहभागी झाले आहे. शासन व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी यांच्यात यापूर्वी झालेल्या औपचारिक चर्चा निष्फळ ठरल्याने नववर्षाची सुरुवातच आंदोलनाने झाली.यवतमाळ नगरपरिषदेत कर्मचारी संघटनेने आंदोलनात सहभाग घेतला. पालिकेच्या वाहनतळात कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला. यवतमाळ पालिकेतील वर्ग ३ चे ४२ कर्मचारी, वर्ग ४ चे ६३, १४ संवर्ग कर्मचारी, हद्दवाढीने समावेशित झालेल्या ग्रामपंचायतीतील ९८ कर्मचारी, १७५ सफाई कामगार असे ३९२ कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाल्याने कामकाज थांबले आहे. आंदोलनामध्ये नगरपरिषद कर्मचारी संघटना, संवर्ग कर्मचारी संघटना, नगर पालिकेत समावेशित ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, सफाई कामगार संघटना, अखिल महाराष्ट्र संघटना यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:20 IST
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेतील १३७४ कर्मचाऱ्यांनी राज्य व्यापारी आंदोलनाला पाठिंबा देत कामबंद आंदोलन सुरू केले ...
पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद
ठळक मुद्देदहा नगर परिषदा : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी लढा