शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुडाणा, शेंबाळपिंपरीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:55 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्देमराठा समाज आक्रमक : आरक्षण लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा/शेंबाळपिंपरी : आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. यात काकासाहेब शिंदे यांनी बलिदात केले. त्यांना प्रथम मुडाणा येथील छत्रपती शिवाजी चौकात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधक एकत्रित आले. रामचंद्र तंबाखे, बाळासाहेब जाधव, गोलू काळे, अंबादास पाटील, अशोक वानखेडे, रमेश जाधव, कपिल जाधव, संदान वानखेडे, सुनील मुधोळ, तानाजी कदम, विनायक पाटील, गजानन चव्हाण, सुनील कदम, आकाश पानपट्टे, गजानन खंदारे, मारोती दांडेगावकर, दुलाजी पाटील, काशिनाथ पाटील, प्रवीण किवले, अमोल कदम, सूरज मादळे, महेंद येनकर, पांडुरंग भिमटे यांनी बंदसाठी पुढाकार घेतला. नंतर पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महागाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.शेंबाळपिंपरी येथे सकाळी ९ वाजता मराठा समाजाने मोर्चा काढला. छत्रपती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तेथे आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनोने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सुनील पागिरे, शैलेश मेटकर, शैलेश वसपूरकर, अमोल जाधव, रामकृष्ण चंदेल, गजानन बोक्से, उपसभापती गणेश पागिरे यांनी विचार व्यक्त केले. नंतर मराठा सेवा संघाचे सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. खंडाळाचे ठाणेदार बी.आर. ठाकूर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात होती. बंददरम्यान कोणतीही अनूचित घटना घडली नाही. बससेवा पूर्णपणे बंद होती.गुंजमध्येही बंदआरक्षणाच्या मागणीसाठी गुंजमध्येही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंदमध्ये सहभागी झाली होती. सायंकाळपर्यंत सर्व दुकाने बंद होती. गावात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण