शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शेतीच्या नावाने गाळ वीटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.

ठळक मुद्देमातीची साठवणूक : गोकी धरणातील गाळ चालला दारव्हा, यवतमाळकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या नावावर वीटभट्टी चालकांनी मातीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळाची ने-आण होत आहे. यातून शासनाच्या तिजोरीला फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दारव्हा तालुक्यातील गोकी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. हा गाळ शेतजमिनीसाठी सुपीक आहे. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना गाळ काढता आला. व्यापाऱ्यांनी या गाळावर आपली नजर वळविली आहे. विटभट्टीकरिता शेतकऱ्याच्या नावावर अर्धा गाळ वळता केला आहे. शहराबाहेर हा गाळ डम्प केला जात आहे.धरणातून गाळ उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने १०० ब्रासच्या तीन परवानगी दिल्या आहे. या ठिकाणी धरणात ३० ते ४० टिप्पर गाळ नेण्यासाठी सारख्या येरझारा मारताहेत. त्याकरिता ६ जेसीबी धरणात उतरविण्यात आले आहे. एक वाहन ८ ते १० येरझारा मारते. यातून संपूर्ण रस्ता क्षतीग्रस्त झाला. हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतात न जाता निम्मा गाळ दारव्हा आणि यवतमाळच्या दिशेने दररोज वळता होत आहे.तहसीलदार येणार असल्याची पूर्वसूचनागोकी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अवैध उत्खननाचा मुद्दा माध्यमातून चर्चेला आल्यानंतर दारव्हाचे प्रभारी तहसीलदार संजय जाधव यांनी अकस्मात या उत्खननावर धाड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार साहेब येणार याची पूर्वसूचना उत्खनन करणाºयांना मिळाल्याने ते सावध झाले होते. उत्खननासाठी वापरणारे जेसीबी व ट्रक परिसरातच उभे होते. मात्र ही वाहने सोडून चालक व मालक तेथून पसार झाले होते. तहसीलदारांना केवळ खोदलेला परिसर व उभी असलेली वाहने हेच पाहावयास मिळाले. आता यात तहसीलदारांकडून कोणावर काय कारवाई होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.परवानगी केवळ ४०० ब्रासचीचगोकी प्रकल्पातून ४०० ब्रास गाळ काढण्याला परवानगी कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या परवानगीच्या आधारे ३१ मेपर्यंत हा गाळ काढण्याच्या सूचना संबंधितांना प्रभारी तहसीलदारांनी दिल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. दोन वीटभट्टी चालकांना १६० रूपये ब्रासप्रमाणे गाळ नेण्यास मुभा आहे. या भागात ३० ते ४० टिप्पर आणि सहा जेसीबी गाळ काढण्याचे काम करीत आहे. याबाबत प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आले आहे.मी मंडळ अधिकाऱ्याला पाहणीसाठी पाठविले होते. त्याने दोन जेसीबी आणि काही वाहन असल्याचे म्हटले. त्यातही एक जेसीबी बंद असल्याचे सांगितले. मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने दिसली. मात्र वाहनचालक पसार झाले होते.- संजय जाधव,प्रभारी तहसीलदार, दारव्हादरवर्षी ५०० ब्रासपर्यंत परवानगी जाते. यावर्षी कोरोनामुळे त्यात घट झाली. ४०० ब्रासला परवानगी दिली. नव्याने ९०० ब्रास उत्खननासाठी अर्ज आले आहेत. त्याची परवानगी बाकी आहे. पाटबंधारे विभाग परवानगी देते तोच व्यक्ती माती उचलत आहे किंवा नाही याची जबाबदारी तहसीलची आहे.- अशोक डगवार, शाखा अभियंता, गोकी प्रकल्प, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी