शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी शिक्षक महामंडळाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:22 IST

२० टक्के अनुदान मंजूर झालेल्या सर्व शाळांना आणि तुकड्यांना पुढील टप्प्याचे अनुदान तातडीने देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना साकडे : शिक्षण क्षेत्रात धरसोडीचे धोरण थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २० टक्के अनुदान मंजूर झालेल्या सर्व शाळांना आणि तुकड्यांना पुढील टप्प्याचे अनुदान तातडीने देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले धरसोडीचे धोरण थांबवा, असे साकडे यावेळी शासनाला घालण्यात आले.यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या मार्फत शिक्षकांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे पाठविले. राज्यातील शालेय शिक्षक समस्याग्रस्त आहेत. राज्यशासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे राज्यात शैक्षणिक असंतोष वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे. खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.शिक्षक कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्राप्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्या, २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या सर्वच शाळांना पुढील टप्पा अनुदान विनाअट मंजूर करावे, निकषपात्र विनाअनुदानित शाळांना सरसकट अनुदान मंजूर करावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवडश्रेणीबाबत २३ आॅक्टोबर २०१७ चा जाचक शासन निर्णय रद्द करावा, मासिक वेतन एक तारखेलाच अदा करावे, शालार्थ आयडी देण्यात यावा, प्रचलित पद्धतीप्रमाणे तोंडी-अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम ठेवावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष अशफाक खान, विभागीय कार्यवाह एम.डी.धनरे, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक