गौतम बुद्ध, सम्राट अशोकांचा वारसा जपण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:19+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या भोन परिसरात मौर्यकालीन प्राचीन भोन बौद्ध स्तुपाचे अवशेष आढळले. या प्रतिकांना नष्ट करण्यासाठी भोन परिसरात पूर्णा नदीवर धरण बांधण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या मदतीने काढण्यात आले.

Movement to preserve the legacy of Gautam Buddha, Emperor Ashoka | गौतम बुद्ध, सम्राट अशोकांचा वारसा जपण्यासाठी आंदोलन

गौतम बुद्ध, सम्राट अशोकांचा वारसा जपण्यासाठी आंदोलन

Next
ठळक मुद्देबुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क : राज्यस्तरीय रॅली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक मौर्य यांचा वारसा जपला जावा, यासाठी यवतमाळ येथे रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. राज्यात एकाचवेळी ३६ जिल्हे आणि ३६० तालुक्यात रॅली काढली गेली. यवतमाळ येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीचे नेतृत्त्व राज्याध्यक्ष सुषमाताई राजदीप यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या भोन परिसरात मौर्यकालीन प्राचीन भोन बौद्ध स्तुपाचे अवशेष आढळले. या प्रतिकांना नष्ट करण्यासाठी भोन परिसरात पूर्णा नदीवर धरण बांधण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या मदतीने काढण्यात आले. सदर अवशेष मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासोबतच पवनी स्तुप, अडम स्तुप, सोपारा स्तुप, कोल्हापूरचा मौर्यकालीन स्तुप नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेले पुणे येथील पहिले बौद्ध विहार नष्ट होण्याचा प्रयत्न आहे. त्याचे जतन करण्यासाठी शासनाकडून काहीही प्रयत्न होत नाही. शासनाच्या या भूमिकेविरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने आंदोलन सुरू केले आहे.
यवतमाळ येथे रॅलीत भन्ते सारिपुत्त, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राज्य अध्यक्ष कुंदाताई तोडकर, बहुजन मुक्ती पार्टीच्या सारिका भगत, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विजयराज शेगेकर, नेटवर्कचे तालुका संयोजक संजय सावळे, रंजना देवळकर, संगीता तेलंग, कांबळे, सिद्धार्थ भुजाडे, विनोद थूल, प्रणाली रणवीर, नौका सोनेकर, वनिता नळे, शीतल सावळे, ताई खरे, स्विटी कपिले, दीपमाला भगत, विशाखा गजभिये, संघमित्रा गायकवाड, राजू उमरे, चंदा वाघमारे, अर्चना महल्ले, कविता नागदिवे, प्रेरणा तागडे, चंदन वानखडे, प्रेरणा गुजर, संघमित्रा गायकवाड, आशा मेश्राम, वैशाली भितकर, सुरज खोब्रागडे, प्रणिता दिघाडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Movement to preserve the legacy of Gautam Buddha, Emperor Ashoka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.