यवतमाळ : शहरातील कंत्राटी सफाई कामगारांनी नगरपरिषदेच्या धोरणाविरोधात कामबंद आंदोलन पुकारले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशाची सुरूवात ही आंदोलनाने झाली. नव्या सफाई कंत्राटातील निकषाने ७० सफाई कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळणार आहे. नगरपरिषदेत १९९० पासून २३६ सफाई कामगार रोजंदारीवर काम करत आहेत. मात्र नगरपरिषदेने या कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्यायच केला आहे. १९९३ मध्ये अस्थाई कामगाराबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचाही लाभ या कामगारांना मिळालाच नाही. नगरपरिषदेने चुकीची माहिती शासनानकडे दिल्यामुळे या कामगारांना कंत्राटदाराकडे राबण्याची वेळ आली. आता नगरपरिषद प्रशासन कंत्राटाच्या निकषात बदल करून सफाई कामागारांच्या कपातीचे धोरण अवलंबिले आहे. २०११-२०१४ मध्ये देण्यात आलेल्या सफाई कंत्रटामध्ये प्रत्येक वॉर्डात तीन कामगार देण्यात आले होते. आता एक महिन्यासाठी कंत्राट दिले जात असताना एका वॉर्डात एकच कामगार दिला जाणार आहे. त्यामुळे आज कार्यरत असलेल्या २३६ कंत्राटी सफाई कामागारांपैकी ७० जणांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या कंत्राटदाराने सफाई कामागराच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसेच जमा केले नाही, अशाच व्यक्तीला कंत्राट दिले जाता असल्याचा आरोप संत गाडगेबाबा नगरपरिषद अस्थाई कामगार विकास संस्थेने केला आहे. जोपर्यंत पुर्ण कंत्राटी कामगारांना कामावर घेत नाही. यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली जात नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे. या आंदोलनाला भीम टायगर सेनेसुुध्दा पाठींबा दिला आहे. कामगारांच्या समस्या लवकरच निकाली काढाव्या अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. नगरपरिषदेतील कचरा सफाईचे कंत्राटच वादाच्या भोवऱ्या सापडले आहे. यावरून सात्याने नवनवीन समस्या निर्माण होत आहे. वर्षाची सुरूवातच आंदोलनाने झाल्यामुळे शहर स्वच्छतेला लागलेले ग्रहण आणखी किती दिवस कायम राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन
By admin | Updated: January 1, 2015 23:10 IST