कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:17+5:30

यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण जिल्ह्यात आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Most patients with corona are in Yavatmal | कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळात

कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण यवतमाळात

Next
ठळक मुद्देदिग्रस हॉटस्पॉट : पाच तालुके मुक्तच , दोन प्रभागांचा प्रतिबंध हटविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यवतमाळची रूग्णसंख्या ५६ वर पोहचली आहे. यासोबतच दिग्रस, दारव्हा, नेर आणि पुसदमध्येही रूग्ण वाढले आहेत.
यवतमाळ शहरात आठ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. यातील गुरूदेवनगर आणि रचना सोसायटीमध्ये नव्याने एकही रूग्ण सापडला नाही. यामुळे या भागातील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात यावे, अशी मागणी तहसील प्रशासनाने आरोग्य विभागाकडे केली आहे.
सध्या स्थितीत यवतमाळात ५६ कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. दिग्रसमध्ये ३० रूग्णांची नोंद झाली आहे. दारव्हा ११, पुसद ३०, नेर २१, वणी ७, उमरखेड ७, आर्णी २, कळंब १, केळापूर ३ तर घाटंजीत १ रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. यामधील काही रूग्ण बरे झाले आहे. १६९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण जिल्ह्यात आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
दिग्रसमध्ये सतत एकाच भागातून रूग्ण आल्याने दिग्रस हॉटस्पॉट जाहीर झाला आहे. तशीच स्थिती पुसद शहराचीही होत आहे. आठ दिवसात १०० नव्या रूग्णाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

जिल्ह्यात पुन्हा १४ रुग्ण वाढले, २५ जणांना सुटी
मंगळवारी जिल्ह्यात १४ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद करण्यात आली. तर बऱ्या झालेल्या २५ जणांना सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णाचा आकडा १४२ वर पोहचला. मंगळवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णामध्ये यवतमाळच्या एकवीरा चौकातील एक, शहरातील एक, पुसदमध्ये तीन पुरूष आणि दोन महिला, ढाणकीमध्ये एक महिला, तर उमरखेडमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आली. घाटंजी तालुक्यातील भांबोरा गावामध्ये एक पुरूष पॉझिटिव्ह आला. दिग्रसमध्ये दोन महिला पॉझिटिव्ह आल्या. दारव्हा शहरात एक महिला आणि एक पुरूष पॉझिटिव्ह आला.

१२ मृत्यू ‘सारी’चे
कोरोनाच्या १३ मृत्यूपैकी १२ मृत्यू ‘सारी’च्या विळख्याने झाले तर ३ नागरिक कोरोना झाल्यावर अंतिम टप्प्यात रूग्णालयात आले नाही. यातून तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.
पाच तालुके कोरोनापासून दूर
जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, बाभूळगाव आणि झरी असे पाच तालुके सध्या कारोनाच्या विळख्यापासून दूर आहेत.

Web Title: Most patients with corona are in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.