शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सकाळचा उत्साह दुपारी निराशेत बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:09 IST

शिवसेनेच्या कार्यालयापेक्षाही सर्वाधिक गर्दी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती. बुधवारपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी कार्यकर्त्यांसाठी चहापान आणि नाश्त्याचीही व्यवस्था झाली होती.

ठळक मुद्देकाँग्रेसला पराभवाचा धक्का : माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी चिंतन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेच्या कार्यालयापेक्षाही सर्वाधिक गर्दी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती. बुधवारपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी कार्यकर्त्यांसाठी चहापान आणि नाश्त्याचीही व्यवस्था झाली होती. उत्साहाचे वातावरण दुपारपर्यंत माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाले. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये अंतर वाढत जाताना कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे सावट पसरल्याचे दिसत होते. भावना गवळी यांच्या मोठ्या मताधिक्याच्या आकडेवारीची वार्ता या ठिकाणी पोहोचल्यानंतर निराशा वाढत गेली. सायंकाळी साडेचार ते पाच वाजेदरम्यान या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. या बैठकीमध्ये माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हितगूज केले. मतातील फरकांची कारणमीमांसा केली जात होती. पुढील काळात हा प्रश्न उद्भवू नये याकरिता कार्यकर्त्यांनी काही टिप्सही माणिकराव ठाकरे यांना दिल्या. सरकारप्रती जनतेमध्ये रोष होता. मात्र हा रोष मतांमध्ये परिवर्तित करता आला नाही, याची खंतही खुद्द माणिकराव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविली. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमच्या उणिवा काय राहिल्या हे तपासले पाहिजे, असेही ते म्हणाले.माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनी निकालाची आकडेवारी पाहून प्रचंड धसका घेतला. त्यांनी माणिकराव ठाकरे यांना धीर देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले प्रयत्न प्रामाणिक होते, असे मतही ठाकरे यांच्यापुढे बोलून दाखविले. एकूणच लागलेल्या निकालाबाबत प्रत्येकाच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण होते. ठाकरेच विजयी होतील म्हणून थेट वाशिम, मानोरा, कारंजा या ठिकाणांवरून कार्यकर्ते मोठ्या संख्येने यवतमाळात आले होते. मतांमधील घसरण पाहून प्रत्येक फेरीला कार्यकर्ते माणिकरावांना धीर देत होते. आपलेही आकडे वाढतील, असा विश्वास देत होते. मात्र सरतेशेवटी मतांतील अंतरच वाढत गेले.मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवरील बातम्या...आपल्या उमेदवाराला किती मते पडली, विरोधी पक्षाला किती मते आहेत याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला होता. संपूर्ण माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉपचाही वापर करण्यात आला. प्रत्यक्षात पुढे येणारे आकडे पाहून सारेच थक्क होत होते. टीव्हीवरील बातम्यांनी तर त्यांच्या मनामध्ये चांगलीच धडकी भरली होती. यानंतरही पुढील फेरी आपलीच असेल, असा विश्वास प्रत्येकाकडे होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल