शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:10 IST

दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देदारूविषयी उदार धोरणदारूबंदी जिल्ह्यातही वाहतो दारूचा पूर

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. आता दारूबाजांना सकाळी चहाच्यावेळी दारूचा घोटसुद्धा मिळण्याचा मार्ग शासनाने खुला करून दिला आहे.एखाद्या आजाराने किंवा साथीने जीतक्या व्यक्तींचा मृत्यू होतो, त्यापेक्षा कित्येक पटीने दारूच्या सेवनाने मृत्यू होत असल्याचे वास्तव आहे. दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील महिलांना याची मोठी झळ बसत आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यातच दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र याच तिनही जिल्ह्यात सर्वाधिक अवैध दारूविक्री सुरू आहे. दारू तस्करांची हिंमत शिगेला पोहोचली आहे. शासन व प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे दारू तस्करांचे जाळे विणले जात आहे. छत्रपती चिडे हे पोलीस अधिकारी या धोरणाचा बळी ठरूनही शासनाने आपल्या दारूविषयक उदार धोरणात बदल घडविण्यास पुढाकार घेतलेला दिसत नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने राज्य महामार्गालगतची बंद करण्यात आलेली दारू दुकाने हळूहळू कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुरू होऊ लागली आहे. तर दारू दुकाने सुरू राहण्याची वेळ वाढवून शासनाने आपले उदार धोरण पुन्हा जाहिर केले आहे. यापूर्वी दारूची दुकाने सकाळी १० वाजता उघडायची व रात्री १० वाजता बंद व्हायची. आता शासनाच्या गृह विभागाने ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजता केली आहे. त्यामुळे दारू शौकीनांना सकाळी चहा पिण्याऐवजी दारूचा घोटच घेणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदी