शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आगामी निवडणुकीत युवकांना मिळणार अधिक संंधी

By admin | Updated: July 24, 2016 00:51 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी सर्वच स्तरावरील निवडणुका कार्यकर्त्यांच्या विशेष समन्वयातून जिंकण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

प्रकाश साबळे : उमरखेडमध्ये काँग्रेसची सभा उत्साहात उमरखेड : प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी सर्वच स्तरावरील निवडणुका कार्यकर्त्यांच्या विशेष समन्वयातून जिंकण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. यात युवकांना सर्वाधिक संधी देणार असल्याचे पक्ष निरीक्षक प्रकाश साबळे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शहर व तालुका, गट आणि गणात पक्ष पोहोचविण्यासाठी पक्ष निरीक्षकांना त्या ठिकाणी जावून प्रत्यक्षदर्शी कार्यकर्ता व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेसने स्थानिक सभा व पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. याच अनुषंगाने बुधवारी स्थानिक नगरपरिषद वाचनालयच्या सभागृहात अमरावती येथील पक्ष निरीक्षक प्रकाश साबळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची समन्वय सभा पार पडली. या सभेला युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष निरीक्षक प्रकाश साबळे म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसचे विचार गावागावांत पोहोचविण्यासाठी पक्षातील प्रत्येक तरूण कार्यकर्त्याने निष्ठेने जबाबदारी पार पाडावयाची आहे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करून पक्षाची ध्येयधोरणे जनतेला समजावून सांगावयाची आहे. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात खोटे बोलून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. सरकार जेवढे अधिक खोटे बोलले, तेवढ्याच प्रमाणात जनता त्यांना आगामी निवडणूक काळात जागा दाखवून देईल, असे मत प्रकाश साबळे यांनी कार्यकर्ता सभेत व्यक्त केले. यावेळी बोलताना साबळे यांनी आगामी सर्वच निवडणुकांत काँग्रेस पक्ष नवयुवकांना अधिक संधी देणार असल्याचेही स्पष्ट केले. युवा कार्यकर्त्यांनी आता जनतेच्या दारात पोहोचून त्यांना काँग्रेसचे विचार पटवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी पक्षात चैतन्य निर्माण करून जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या जनताविरोधी धोरणांची माहिती पटवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे होते. मंचावर शहर अध्यक्ष, नगरपरिषद गटनेते नंदकिशोर अग्रवाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तातू देशमुख, युवा नेते राम पाटील देवसरकर, तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण, नगराध्यक्ष उषा आलट, महिला अध्यक्ष सविता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष निरीक्षकांनी शे. गणी आणि शे. हमीद कुरेशी (ढाणकी), महंमद सलीम या तिघांची काँग्रेस अल्पसंख्यक आघाडीवर निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांनी कार्यकर्त्यांचेही म्हणणेही आवर्जुन ऐकून घेतले. त्यांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. या कार्यकर्ता सभेला बाळासाहेब चंद्रे, छाया धुळध्वज, शिवाजी वानखेडे, ज्योती ठेंगे, वंदना घाडगे, सोनू खतिब, दारासिंग खडे, विविध गावातील सरपंच, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच संस्था पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन नगरपरिषद सभापती शैलेंद्र मुंगे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)