लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : मीरा-भार्इंदर महानगर पालिका निवडणुकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी जैन मुनीवरील केलेल्या टिकेच्या निषेधार्थ दारव्हा येथे जैन बांधवांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी, ठाणेदार यांना निवेदन सादर करून खासदार राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.सुरुवातीला मोठ्या संख्येनी जैन बांधव येथील जैन मंदिराच्या प्रांगणात गोळा झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चा तहसील परिसरात पोहोचला. तिथे सभा घेण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. खासदार राऊत यांनी जैन मुनीवर अत्यंत खालच्या पातळीवर टिका केल्यामुळे अतिशय दु:ख व मानसिक त्रास झाला. त्यामुळे खासदार राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी प्रकाशचंद मुथा, राजेश खिवसरा, डॉ.चेतन गुगलिया, दिनेशराज कोठारी, किशोर खिवसरा, डॉ.दामोदर लढ्ढा, मनोहर लढ्ढा, अॅड.संदीप खिवसरा, महेंद्र बजानीया, गौतम मुथा, बागरेचा, साबद्रा यांच्यासह सकल जैन समाज, राजस्थानी माहेश्वरी, मारवाडी, अग्रवाल बांधव भगिनी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
जैन मुनींवरील वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:53 IST
मीरा-भार्इंदर महानगर पालिका निवडणुकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी जैन मुनीवरील केलेल्या टिकेच्या निषेधार्थ ....
जैन मुनींवरील वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा
ठळक मुद्देतक्रार दाखल : शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी