शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळाच्या पाण्यासाठी मोजावे लागणार पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:05 IST

अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणावर भुर्दंड : भिस्त निळोणा आणि चापडोहवरच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. पाणी टंचाईच्या काळात याच प्रकल्पाची यवतमाळकरांना आशा आहे. मात्र बेंबळा हा सिंचन प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पैसे मोजावे लागणार आहे. परिणामी त्याचा भार यवतमाळातील सर्वसामान्य ग्राहकांवरच येणार आहे. बेंबळाचे पाणी शहरात आले तरी सर्वाधिक भिस्त निळोणा आणि चापडोह या दोन हक्काच्या प्रकल्पावरच राहणार आहे.यवतमाळ शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभरानंतरही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे यवतमाळकरांची तहान टँकरने भागविली जात आहे. अशा परिस्थितीत बेंबळा प्रकल्प यवतमाळकरांसाठी वरदान आहे. या प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी ३०२ कोटींचा अमृत प्रकल्प शहरासाठी मंजूर झाला. पाणीटंचाईत दिलासा देण्यासाठी या प्रकल्पाचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. मे महिन्यापर्यंत पाणी मिळेल, असे प्रशासकीय स्तरावरून सांगितले जात असले तरी अद्यापही या पाण्याबद्दल कुणीही खात्रीशिरपणे सांगत नाही. मात्र आता हा प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील असल्याने त्या प्रकल्पातील पाणी जीवन प्राधिकरणाला विकत घ्यावे लागणार आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह हे दोनही प्रकल्प केवळ पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्यासाठी प्राधिकरणाला पैसे मोजावे लागत नाही. परंतु बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेताना प्रत्येक दशलक्ष घनमीटरला चार ते पाच लाख रुपये मोजावे लागणार आहे. ही रक्कम जीवन प्राधिकरणाच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष भार यवतमाळ शहरातील नळ ग्राहकांवर येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला सध्यातरी पर्यायी प्रकल्प म्हणूनच उपयोगात आणण्याचा विचार जीवन प्राधिकरणाचा आहे. सुरुवातीला निळोणा आणि चापडोह याच प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना वितरित केले जाईल. मात्र अमृत योजनेत २४ तास आणि सात दिवस अशी अट असल्याने बेंबळा प्रकल्पच ही अट पूर्ण करू शकते. त्यामुळे बेंबळा प्रकल्पाचे पाणी विकत घ्यावे लागणार आहे.संचय क्षमता वाढविणारयवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पाची संचय क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून खोदकाम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पावर आता जीवन प्राधिकरणाने लक्ष केंद्रीत केले आहे.बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची साठवण क्षमता ३२२ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पात निळोणा सारखे ५० प्रकल्प बसतात. पाच वर्षे पुरेल इतके पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बेंबळा प्रकल्पाची आहे. विशेष म्हणजे २०७८ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित राहील असे डिझाईन तयार करण्यात आले आहे. निळोणा प्रकल्पाची साठवणूक क्षमता ६.३९ दशलक्ष घनमीटर तर चापडोह प्रकल्पाची साठवण क्षमता १३.५९ दशलक्ष घनमीटर आहे. परंतु आता दोनही प्रकल्प यवतमाळ शहरासाठी अपुरे ठरत आहेत.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण