शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांच्या हातून पैसा सुटेना

By admin | Updated: August 21, 2015 02:49 IST

जिल्ह्यासाठी ६३ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा वळता केला. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी आपली जबाबदारी अद्यापही पूर्ण केली नाही.

पेच पीक विम्याचा : १५ कोटी येऊनही शेतकऱ्यांचे खाते रिकामेयवतमाळ : जिल्ह्यासाठी ६३ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा वळता केला. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी आपली जबाबदारी अद्यापही पूर्ण केली नाही. परिणामी, बँकामध्ये पीकविम्याच्या हप्त्यासाठी येरझारा मारूनही शेतकऱ्यांच्या हातात एक पैसाही पडला नाही. अशाच स्थितीत सावकारी कर्जावर पेरण्या आटोपल्या. मात्र, हक्काचा विमा शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही. याबाबत अग्रणी बँकेला अंधारात ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यातील एक लाख दोन हजार ६०२ शेतकऱ्यांना ६३ कोटी १९ लाख रूपयांचा विमा मंजूर झाला. या पीकविम्यातील १५ कोटींचे वाटप जिल्ह्यातील १९ राष्ट्रीयकृत बँका करणार होत्या. १९ हजार ८५० शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार होता. प्रारंभी या बँकांना उशिरा निधी मिळाला. यामुळे वाटप झाले नाही. १५ दिवसांपूर्वी हा निधी जिल्ह्यात आला. मात्र, अद्यापही तो शेतकऱ्यांच्या खात्यात वळता झालेला नाही. बँकांनी पीकविमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादीही बँकेच्या आवारात लावली नाही. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गावखेड्यातील शेतकरी दररोज येरझारा मारत आहेत. मात्र, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आपल्या खात्यात निधी नसल्याची खंत हे शेतकरी बँक मॅनेजरकडे व्यक्त करतात. शाखा व्यवस्थापक मात्र, निधीच आला नाही, असे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. यंदा पीक परिस्थिती चांगली असली तरी गतवर्षीचे देणे बाकी आहे. अशा स्थितीत बँकांमध्ये शेतकरी वारंवार येऊन चौकशी करीत आहे. (शहर वार्ताहर)अग्रणी व्यवस्थापकांचा वचक संपलाराष्ट्रीयकृत बँकांवर नियंत्रणाची जबाबदारी अग्रणी बँकेकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक अग्रणी बँक व्यवस्थापकांचा आदेशही जुमानत नाही. यामुळे शाखा व्यवस्थापकांना वारंवार सूचना केल्यानंतरही पीकविमा वाटपाची माहिती दिली जात नाही. इतकेच नव्हेतर, गावपातळीवर राष्ट्रीयकृत बँकांनी पीक विम्याचा निधी आला याची माहितीच दिली नाही. यातून शेतकऱ्यांना वारंवार येरझारा माराव्या लागतात.