शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूत उतरविण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने केला अत्याचार; यवतमाळातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 07:20 IST

Yawatmal News पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेला भूतबाधा झाल्याचे भासवून तिच्यावर मंत्रोपचार करण्यासाठी आलेल्या मांत्रिकानेच अत्याचार केला.

ठळक मुद्देभूत शक्तीशाली असल्याचे सांगून नातेवाइकांना काढले घराबाहेर

यवतमाळ : गरीब कुुटुंबातील महिलांचे आजारपणाबाबतचे अज्ञान व उपचारासाठी पैशाची चणचण, यातून अंधश्रद्धेचे खतपाणी घातले जाते. याच कारणाने पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेला भूतबाधा झाल्याचे भासवून तिच्यावर मंत्रोपचार करण्यासाठी आलेल्या मांत्रिकानेच अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या मांत्रिकाने भूत शक्तीशाली आहे, असे सांगून महिलेच्या नातेवाइकांना घराबाहेर काढले व तिथेच रात्रभर तिचे शोषण केले.

आधुनिक युगात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक माध्यमांतून प्रयत्न केले जातात. समाजमाध्यमांसोबतच विविध टीव्ही मालिकांतूनही अंधश्रद्धेचा भांडाफोड केला जातो. त्यानंतरही परिस्थितीने पिचलेली व्यक्ती अज्ञानातच गुरफटलेली असते. याचाच फायदा संधीसाधू घेतात. यवतमाळातील नागपूर रोड परिसरात राहणाऱ्या महिलेला तिची प्रकृती चांगली राहत नसल्याने पतीने घराबाहेर काढले. आई-वडील नसल्याने ती महिला नातेवाइकांकडे आश्रयाला होती. वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण सांगून तिच्याच एका नातेवाइकाने तेलंगणातील आदिलाबाद येथून ओळखीच्या मांत्रिकाला पाचारण केले.

शेखरअण्णा (२९, रा. आदिलाबाद) हा मांत्रिक त्याच्या दोन चेल्यांना घेऊन यवतमाळात आला. गुरुवारी (दि. २७) या मांत्रिकाने पीडित महिलेची तपासणी केली. महिला सुस्वरूप असल्याचे पाहून मांंत्रिकाने डाव रचला. या महिलेला भूतबाधा झाली असून, हे पिश्याच्य तत्काळ बाहेर काढणे गरजेचे आहे. हे भूत मोठे शक्तीशाली आहे. त्याच्यापासून केवळ त्या महिलेची सुरक्षा करू शकतो. महिलेवर मंत्रोपचार करताना चिडलेली भूत तेथे उपस्थित इतरांना नुकसान पोहोचवू शकते. त्यातून झालेल्या नुकसानीची जबाबदारी माझी नाही, असे मांत्रिकाने सांगितले. यावर उपायाची विचारणा महिलेच्या कुटुंबीयांनी केली असता, महिलेला व मला एकांतवास हवा. तेथेच हा विधी करता येईल, असे सांगितले. भाबड्या नातेवाइकांनी यावर विश्वास ठेवून स्वत:चे घर व त्या पीडित महिलेला मांत्रिकाच्या ताब्यात दिले.

मांत्रिकाने पीडित महिलेवर रात्रभर अत्याचार केला. यामुळे महिला आणखीच धास्तावली. तिला काहीच सुचेनासे झाले. सकाळी मांत्रिक व त्याचे साथीदार पसार झाले. भानावर आल्यानंतर महिलेने आपबिती आपल्या नातेवाइकांजवळ सांगितली. अखेर पीडित महिलेला घेऊन नातेवाइकांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी मांत्रिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी सायंकाळी सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी