शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियांवर मोक्का, एमपीडीए लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील गुन्हेविषयक आढावा बैठक शुक्रवारी येथे पार पडली. विविध विषयांवर आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. रेती तस्करी हा जिल्ह्यातील महसूलपाठोपाठ पोलीस यंत्रणेसाठीही आव्हानाचा विषय ठरला आहे. थेट नायब तहसीलदारांना चाकू मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत रेतीमाफियांची मजल गेली आहे. या रेतीमाफियांना सत्ताधाऱ्यांचे राजकीय अभय असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आदेश : जिल्ह्यातील गुन्हेगारीचा ठाणेदारांकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेतीमाफिया व क्रियाशील गुंडांनी धुडगूस घातला असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोक्का, एमपीडीए लावा, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील गुन्हेविषयक आढावा बैठक शुक्रवारी येथे पार पडली. विविध विषयांवर आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. रेती तस्करी हा जिल्ह्यातील महसूलपाठोपाठ पोलीस यंत्रणेसाठीही आव्हानाचा विषय ठरला आहे. थेट नायब तहसीलदारांना चाकू मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यापर्यंत रेतीमाफियांची मजल गेली आहे. या रेतीमाफियांना सत्ताधाऱ्यांचे राजकीय अभय असल्याचे बोलले जाते. चाकूहल्ला करून कर्नाटकात आश्रय घेतलेल्या रेतीमाफिया तथा अट्टल गुंड अविनाश चव्हाण याला उमरखेड पोलिसांनी घटनेच्या १६ दिवसांनंतर बेळगावातून अटक केली. यावरून रेती तस्करीत नेमके कोण सक्रिय आहे हे स्पष्ट होते. पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात चालणारी रेतीची वाहने पकडून कारवाई करावी, वारंवार कारवाई करूनही न जुमानणाऱ्या माफिया-तस्करांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा), एमपीडीए (झाेपडपट्टी दादा कायदा) लावण्याचे आदेश देण्यात आले. ठाणेदारांनी आपल्या हद्दीतील माफिया, सक्रिय गुंड यांची यादी तयार करावी, त्यांच्या टोळीवरील रेकॉर्ड तपासून माेक्का, एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून सादर करावेत, असे आदेश पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी दिले आहेत. उमरखेड येथील तहसीलदारांवर हल्ला करणारे माफिया अविनाश चव्हाण व त्याच्या साथीदारांवर मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे.

वाढत्या गुन्हेगारीवर चिंता, डिटेक्शनचे आव्हान शुक्रवारच्या क्राईम मीटिंगमध्ये वाढती गुन्हेगारी, गुन्हा घडण्यापूर्वीच प्रतिबंध करणे, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविणे, घडलेला गुन्हा उघडकीस आणणे, न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये गुन्हे शाबिती व शिक्षेचे प्रमाण वाढविणे, प्रलंबित मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सामाजिक शांततेला धोकादायक ठरू पाहणाऱ्या घटकांवर गोपनीय पद्धतीने वॉच ठेवणे, वाहतूक नियंत्रण, दारू, मटका, जुगार, गुटखा, अमली पदार्थ व इतर अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेणे यासंबंधीही पोलीस अधीक्षकांनी आदेश देऊन मार्गदर्शन केले. 

‘एसडीएम’कडे तडीपारीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या स्तरावर तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तेथे संबंधित गुंड गावात राहणे कसे धोकादायक आहे, हे सांगून त्याला तडीपार करण्याबाबत युक्तिवाद करावा, मुद्दे मांडावे, असे निर्देश देण्यात आले आहे. या बैठकीत इतरही मुद्द्यांवर सविस्तर आढावा घेतला गेला.

 

टॅग्स :Policeपोलिसsandवाळू