शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

६५ लाखांचे अपहार प्रकरण : आमदारांसह ११ जणांचाही मोबाईल 'नॉट रिचेबल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 14:39 IST

उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली.

ठळक मुद्देपोलिसांकडून शोध सुरू

यवतमाळ : नगरपरिषदेच्या ६५ लाख रुपयांच्या घनकचरा संकलन घोटाळ्यात मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी लेखी तक्रार दिल्यापासून गुन्हा नामदेव ससाणे दाखल होईपर्यंत प्रत्येक गोष्टीची कुणकुण या प्रकरणातील ११ ही दोषींना लागली होती. तांत्रिक तपासाच्या आधारावर मोबाईल लोकेशन घेत कुठल्याही क्षणी पोलीस आपल्याला अटक करू शकतात याची भीती त्यांना होती. त्यातूनच आमदार नामदेव ससाने यांच्यासह १५ ही जणांनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मोबाईल बंद केले असून ते सर्व फरार आहेत.

उमरखेडच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार उघडकीस आला आहे. २०१७-१८ मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ संरक्षण घनकचरा वाहतूक आणि सपाटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते शेख जमील अहमद उस्मान यांनी केला. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाने सुनावणी करून २१ जानेवारी रोजी या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उमरखेडचे मुख्याधिकारी चारूदत्त इंगुले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आमदार नामदेव ससाने यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

नगरपालिकेच्या या ६५ लाखांच्या प्रकरणात भाजपचे विद्यमान आमदार नामदेव ससाने, दिलीप सुरते, सविता पाचकोरे, राष्ट्रवादीचे माजी नगराधअयक्ष व विद्यमान नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, शिवसेनेचे अनमोल तिरंगकर या राजकीय लोकांवर तसेच तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, तत्कालीन आरोग्य निरीक्षक विशाल श्रिवास्तव, कंत्राटदार गजानन मोहळे, फिरोज खान व नांदेड येथील पल्लवी एंटरप्राईजेस अशा ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अन्य प्रकरणातील भ्रष्टाचारही काढणार

उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली. मात्र, नगरपरिषदेत इतरही अनेक बोगस प्रकार आहेत. त्याचीही लेखी तक्रार करून भ्रष्टाचार बाहेर काढू असे मत याचिकाकर्ते तथा नगरपरिष देतील विरोधी गटनेते नगरसेवक जलील कुरेशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीMLAआमदार