शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मिस वर्ल्ड मानुषीचे ड्रेस डिझाईनिंग केले होते यवतमाळच्या तरुणीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 10:02 IST

मानुषी छिल्लर नावाच्या भारतीय तरुणीने यंदाचा ‘मिस वर्ल्ड’ खिताब जिंकून आणला. तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढविण्यात तिच्या दिलखेचक कपड्यांचा सिंहाचा वाटा होता. अन् हे झळाळते वस्त्र कसे असावे याचा निर्णय कुणी घेतला? यवतमाळच्या मुलीने..! हो, शिफा जलाल गिलानीने.

ठळक मुद्देशिफा गिलानी : अपसाईड डाउन.. होल वर्ल्ड

अविनाश साबापुरे/ यवतमाळ : मानुषी छिल्लर नावाच्या भारतीय तरुणीने यंदाचा ‘मिस वर्ल्ड’ खिताब जिंकून आणला. तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढविण्यात तिच्या दिलखेचक कपड्यांचा सिंहाचा वाटा होता. अन् हे झळाळते वस्त्र कसे असावे याचा निर्णय कुणी घेतला? यवतमाळच्या मुलीने..! हो, शिफा जलाल गिलानीने.

जगाला मोहिनी घालणारे सौंदर्य भारतात आहेच; पण त्याहूनही सुंदर भारतीयांची सौंदर्यदृष्टी आहे. हीच पारखी नजर यवतमाळची शिफा लहानपणापासून बाळगून आहे. मानुषी छिल्लर जेव्हा विश्वसुंदरी स्पर्धेत उतरली, तेव्हा शिफा मानुषीची अधिकृत असोसिएट स्टायलिस्ट बनली. तुम्ही साकारलेले वस्त्रप्रावरण घातलेली मानुषी विश्वसुंदरी झाली, तेव्हा कसे वाटले या प्रश्नावर शिफा म्हणाली, ‘ये एक लर्निंग प्रोसेस था.. मेरेलिए भी और मानुषी के लिए भी. मैने मानुषी के ड्रेस नही बनाये बल्की उस के ड्रेस कैसे हो, डिझाईन कैसा हो इसका हर डिसिजन दिया.’

यवतमाळचे प्रसिद्ध असामी जानमहंमद गिलानी यांची ही नात. तर जलाल आणि मुनिझा गिलानी यांची ती लाडकी लेक. यवतमाळच्या महिला विद्यालयात, सेंट अलॉयसियसमध्ये शिफाने प्राथमिक शिक्षण घेतल्यावर पाचगणीच्या संजीवन विद्यालयात, नागपूरच्या सेंटर पॉर्इंट स्कूलमध्ये ती शिकली. सुंदर दिसणारे जग अधिक सुंदर कसे करता येईल, हा शिफाचा ध्यास तिला फॅशन जगताकडे खेचत होता. म्हणूनच सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन येथून शिफाने फॅशन कम्युनिकेशन विषयाची पदवी मिळविली. अलिकडेच लंडन कॉलेज आॅफ फॅशनमधून शिफाने फॅशन मिडिया प्रॉडक्शनची पदव्यूत्तर पदवी प्राविण्यासह मिळविली आहे. यवतमाळची शिफा मुंबईत स्थायिक झाली असली, तरी ती म्हणते, ‘यवतमाल मेरा घर हैं और वो घरही रहेगा..!’कपडो से टॅलेन्ट झलकता हैं..!बौद्धिक झेप, निर्णय क्षमता, स्वभाव या व्यक्तिमत्त्वाच्या या विविध पैलूंचा ‘देखावा’ न होता ते ‘प्रेक्षणीय’ व्हावे यासाठी योग्य वस्त्रप्रावरणे महत्त्वाची ठरतात. मानुषीसाठी तेच काम शिफाने केले. ती म्हणते, कपडो का बहोत इम्पॉर्टन्स होता हैं. मानुषी के लिए बेहतर से बेहतर डिझाईन देने की हम ने कोशीश की. मानुषी खुद भी एक ‘चूझर’ हैं. कपडों की उसे सुझबूज हैं. कपडो से आपका मूड, आपका टॅलेन्ट भी झलकता हैं..!अपसाईड डाउन.. होल वर्ल्डशिक्षणात वेगळी वाट चोखाळणारी शिफा गिलानी आगळ्या वेगळ्या यशाची धनी झाली आहे. जगापेक्षा वेगळे काहीतरी करणारी शिफा आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेट्समध्ये लिहिते...अपसाईड डाउन होल वर्ल्ड.. म्हणजे संपूर्ण जगात उलथापालथ! अन् तिच्या कामगिरीने ही उलथापालथ प्रत्यक्ष घडवून आणली. तब्बल १७ वर्षानंतर मिस वर्ल्डचा खिताब भारतात आला.

टॅग्स :Miss Worldविश्वसुंदरी