शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पालकमंत्र्यांच्या घरापुढे भाजीपाला फेकला

By admin | Updated: June 4, 2017 01:08 IST

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, ठराविक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून संप मागे घेण्यात आल्याच्या वावड्या मुख्यमंत्री पसरवित आहे.

लोकजागृती मंचचे निषेध आंदोलन : मुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक दुधाचा अभिषेक, पोलिसांना हुलकावणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र, ठराविक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून संप मागे घेण्यात आल्याच्या वावड्या मुख्यमंत्री पसरवित आहे. भाजपाचे आश्वासन म्हणजे चुनावी जुमला असतो. या जुमल्यावर जाऊ नका. कर्जमाफी होईपर्यंत संप सुरूच ठेवा, असा उद्घोष करीत लोकजागृती मंचतर्फे शनिवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरापुढे निषेध आंदोलन करण्यात आले. लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते शेतकरी पालकमंत्र्यांच्या घरावर धडकले. आंदोलनाची खबर मिळाल्याने तेथे आधीच तगडा पोलीस बंदोबस्त होता. परंतु, पोलिसांच्या देखतच शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकले. भाज्या फेकल्या. भाजपा सरकारचा निषेध असो, खोटारड्या मुख्यमंत्र्यांचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतीक म्हणून मुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याला अक्षरश: दुधाचा अभिषेक करण्यात आला. ढोल आणि डफड्यांच्या निनादात झालेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले. तत्पूर्वी लोकजागृतीमंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे निवेदन पाठविण्यात आले. यवतमाळसह राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोग विनाविलंब लागू करावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, कृषीपंपासाठी २४ तास मोफत वीज पुरवठा द्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.शेतकऱ्यांचा संप सुरूच राहणारदत्त चौकातील आंदोलन : सरकारने विश्वासघात केल्याचा लोकजागृती मंचचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्त चौकातील घरासमोर गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करणाऱ्या लोकजागृती मंचने शेतकऱ्यांचा संप पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय भाजपा सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करण्यात आला. संपकरी शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र संप सुरूच राहणार आहे. खरीप २०१५ ची ३११७ कोटी ५४ लाख रुपयांची दुष्काळी मदत उच्च न्यायालयात शपथपत्र देऊनही फडणवीस सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत मागण्या मार्गी लावण्याच्या आश्वासनावर आता शेतकऱ्यांचा विश्वास नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडी येथे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर ते पाळता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. त्यामुळे राज्यपालांनीच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देवानंद पवार यांनी केली. यावेळी देवानंद पवार यांच्यासह, हेमंत कांबळे, गोपाळ उमरे, प्रमोद गंडे, साहेबराव पवार, संतोष गंडे, गजू शेंडे, चंदू कुडमथे, चंद्रजोत ओळंबे, माधव कुमरे, सुभाष हजारे, बंडू आडे, जयवंत आडे, प्रकाश राठोड, पंडित राठोड, राजू पवार, श्रीराम आडे, ज्ञानेश्वर आडे, निकेश आडे, लचूराम जाधव, दिनेश राठोड, वसराम राठोड, सुयश राठोड, हरिदास राठोड, रघुनाथ आडे, प्रदीप गवळी, सुनिल कांबळे, विनोद आत्राम, सहदेव आडे, दिलीप कोवे, संजय राठोड, पुंडलीक सावरबांधे, रवींद्र राठोड, सुनिल जाधव, किशोर आत्राम, गोपाल कोवे, मंगेश मानकर, अर्जुन पुसनाके, एकनाथ दुलाकर, बळवंत खरतडे, अमरनाथ नगराळे, महादेव सशवार, नारायण ठाकरे आदी सहभागी होते. पालकमंत्र्यांशी शाब्दिक चकमक आंदोलन सुरू असतानाच पालकमंत्री मदन येरावार बाहेर आले. त्यांनी आंदोलकांना मागण्यांचे निवेदन मागितले. मात्र आंदोलकांनी एवढी घोषणाबाजी सुरू असताना तुम्हाला मागण्या माहीत नाही काय, असा सवाल केला. त्यानंतर पालकमंत्री निघून गेल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा संतापाच्या भरात भाज्या, कांदे भररस्त्यावर त्वेषाने फेकण्यास सुरूवात केली. पोलिसांनी देवानंद पवार यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन वडगाव रोड पोलीस ठाण्यात नेले.