शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘एमआयएम’ची यवतमाळात मोटरसायकल रॅली

By admin | Updated: November 14, 2016 01:34 IST

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमांना आता रंग चढू लागला आहे. रविवारी एमआयएमच्या

यवतमाळ : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमांना आता रंग चढू लागला आहे. रविवारी एमआयएमच्या (आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहद-उल-मुस्लीमिन) उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले. तर पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ‘नारा-ए-तकबीर अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले.यवतमाळ नगरपालिकेच्या आखाड्यात पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने उमेदवार उतरविले आहेत. त्यांच्या प्रचार मिरवणुकीसाठी खासदार असदोद्दीन ओवेसी आणि आमदार इम्तियाज जलील शहरात दाखल झाले. मात्र प्रकृती बिघडल्याने खासदार ओवैसी रॅलीमध्ये सहभागी होऊ शकले नाही. परंतु, आमदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे राज्याध्यक्ष सैयद मोईन यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाज अहमद यांनी आमदार इम्तियाज जलील, राज्याध्यक्ष सैयद मोईन यांचे स्वागत केले. दुपारी २ वाजता कळंब चौकातून रॅलीला सुरूवात झाली. ‘देखो देखो कौन आया.. एमआयएम का शेर आया’, ‘नारा-ए-तकबीर अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा वालदे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सुनिल पुनवटकर, एमआयएमचे अंजुम इनामदार, राजू मलीक, अखनर शारिक, एजाज जोश, नाजीर अहेमद, अशोक शेंडे, संजय बोरकर, रवी पाटील, गुणवंत गणवीर, धनंजय गायकवाड, घनश्याम जोगळेकर, धवने आणि बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. कळंब चौकातून निघालेली रॅली आंबेडकर चौक, नगरपरिषद शाळा क्रमांक पाच, अप्सरा टॉकीज चौक, स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक अशा मार्गाने बसस्थानक चौकात पोहोचली. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करीत ही रॅली इंदिरा गांधी मार्केट, जयहिंद चौक, मेन लाईन, तहसील चौक अशा मार्गाने पुन्हा कळंब चौकात पोहोचली. या ठिकाणी रॅलीचे विसर्जन केल्यानंतर एमआयएमच्या स्थानिक कार्यालयाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)