जिल्हा परिषद : माहिती मिळत नसल्याने रोषयवतमाळ : वारंवार मागूनही माहिती मिळत नसल्याने अखेर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सदस्य अमोल राठोड यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यावरून ही बैठक चांगलीच गाजली. बांधकाम समितीची बैठक सभापती तथा समितीचे अध्यक्ष सुभाष ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या बैठकीमध्ये अमोल राठोड व मिलिंद धुर्वे या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या अनेक बैठकांमध्ये अमोल राठोड बांधकामांशी संबंधित माहिती मागत आहे. कुठून किती निधी आला, कोण्या तालुक्यात किती वाटप झाले या संबंधीही माहिती होती. परंतु प्रत्येक वेळी त्यांना अधिकाऱ्याने माहिती देणे टाळले. माहितीच मिळत नसेल तर या समितीवर राहून उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करीत अमोल राठोड यांनी बांधकाम समिती सदस्यपदाचा राजीनामा समितीचे अध्यक्ष सुभाष ठोकळ यांना सादर केला. मिलिंद धुर्वे यांनीही माहिती मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. अमोल राठोड हे ज्येष्ठ सदस्य आहेत. ते यापूर्वी शिक्षण व आरोग्य सभापती राहिले आहे. समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्वजिल्हा परिषदेतील बांधकाम समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. अध्यक्ष सुभाष ठोकळ, सदस्य ययाती नाईक, अर्चना राऊत, राकेश नेमनवार, अमोल राठोड हे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मिलिंद धुर्वे अपक्ष आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, बांधकाम समितीचे अध्यक्ष आणि बहुतांश सदस्य राष्ट्रवादीचे असूनही पक्षाच्याच ज्येष्ठ सदस्याला माहिती मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. जिल्हा परिषदेतील अधिकारीवर्ग राष्ट्रवादीला जुमानत नसल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
बांधकाम समिती सदस्याचा राजीनामा
By admin | Updated: March 3, 2016 02:29 IST