शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा अन् पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 07:18 IST

पांढरकवडा येथील महिला मेळाव्यातील घटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होती सभा

नरेश मानकर

पांढरकवडा (यवतमाळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या महिला महामेळाव्यात ५-६ तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुड्डेटवार (१२, रा. शिवाजी वार्ड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

क्षितीजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील आहे. वडिलांचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर ती आईसह आजोळी पांढरकवडा येथे राहायला आली. येथील जिल्हा परिषद विद्यालयात ती शिकत होती. १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसाहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधानांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता व सात वर्षांचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उन्हही जोरात होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. गर्दीमुळे महिलांना बाहेर निघणे कठीण होते.

‘जागीच बसून रहा’ : पोलिसांचे फर्मान

सुरक्षेच्या कारणावरून ‘जागीच बसून रहा’ असे फर्मान पोलीस अधिकाऱ्यांकडून सोडले जात होते. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना रहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावली. तिला आधी पांढरकवड्यातील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळला हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर आॅक्सीजन लावून क्षितीजाला पांढरकवडा येथे घरी आणण्यात आले. मात्र तेथे बुधवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. पांढरकवडा येथे दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महिलांमध्ये संतप्त भावनासभेत पाण्याची व्यवस्था न केल्याने क्षितीजाचा मृत्यू झाल्याची संताप्त भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली. क्षितीजाचे बुधवारी निधन झाले, तरी कुणी भाजपा पदाधिकारी तिच्या घराकडे फिरकला नाही.पोलिसात तक्रार नोंदविणारमृतक क्षितीजाची आई सुनीता गुड्डेटवार या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणार असल्याचे पद्मशाली समाजाच्या एका पदाधिकाºयाने गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.क्षितीजाला नरेंद्र मोदींच्या महिला मेळाव्यात वेळीच पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिची प्रकृती खालावली व त्यातच तिचा मृत्यू झाला. मात्र यात आता नेमका दोष कुणाला द्यावा हेच समजत नाही.- विनोद पेंटावार (पांढरकवडा) क्षितीजाचे मामा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYavatmalयवतमाळ