शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मेडिकलमधील उपचार महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:23 IST

गरिबांसाठी उपचाराकरिता हक्काचे आणि परवडणारे ठिकाण असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयानेही शुल्कवाढ केली आहे. टप्प्याटप्प्याने आणखी काही तपासण्यांचे शुल्क वाढविले जाणार आहे.

ठळक मुद्देगरिबांवर अन्याय : जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला प्रश्न, ओपीडीचे शुल्क २० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरिबांसाठी उपचाराकरिता हक्काचे आणि परवडणारे ठिकाण असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयानेही शुल्कवाढ केली आहे. टप्प्याटप्प्याने आणखी काही तपासण्यांचे शुल्क वाढविले जाणार आहे. झालेली शुल्कवाढ रद्द करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्की राऊत, उपाध्यक्ष पारस अराठे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन सादर केले. शासन निर्णयानुसार शुल्क वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र गरिबांना जुन्याच दरात ही सेवा मिळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ओपीडी कार्ड शुल्क पूर्वी दहा रुपये होते. आता २० रुपये करण्यात आले आहे. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया, एक्स-रे, रक्त तपासणी शुल्कातही पुढे वाढ केली जाणार आहे. ही बाब अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील नागरिक आर्थिक अडचणीत आला आहे. अपुरा पाऊस, नापिकी आदी कारणांमुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. खासगीत उपचार कठीण होऊन बसले असताना सरकारी रुग्णालयानेही शुल्क वाढ केली आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गरिबांच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा विचार करून शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना नगरसेवक बबलू देशमुख, मुकेश देशभ्रतार, बाळासाहेब गिरपुंजे, राहुल राऊत, कदीर मिश्रा, गुणवंतराव डोळे, सुरेश लोहाणा, गोलू भगत, हरिद्वार खडसे, चंद्रशेखर गायकी, बबलू राठोड, रमेश भिसनकर, संजय गायधने, सुनील कांबळे, सुहास सरगर, श्रीकांत आडे, चिंतामण पायघन, चरणदास बारसे, कृष्णा पुसनाके, रवी चव्हाण, पंजाबराव चव्हाण, आशीष ढोले, समीर कुलकर्णी, आनंदराव मेटकर, बंटी इंगोले, बाबू अन्सारी, भारत गजभिये, दिनकर जाधव, मंगेश देवकते, सैयद जुनेद, विशाल डेहनकर आदींची उपस्थिती होती.