शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत महिलेचा मेडिकलने पोलिसांना पाठविला मृत्यू अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

उज्वला राजेश वानखडे रा. शांतीनगर वडगाव या महिलेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी डॉ. प्रीती खंडारे यांनी मेमो तयार केला. तो मेमो वॉर्डबॉय नीलेश खंडाळकर याच्या माध्यमातून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाठविला. पोलिसांनी जबानी घेण्याऐवजी त्या मेमोवरून जिवंत महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद मर्ग डायरीमध्ये घेतली. त्याचा मर्ग क्रमांक ५४/२०२० असा आहे.

ठळक मुद्देमोठ्या वडगावातील वानखडे कुटुंबीयांना बसला धक्का : मृत्यूपूर्व जबानीऐवजी थेट दाखल केला मर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांचा अकस्मात मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाकडून ‘डेथ मेमो’ (मृत्यू अहवाल) संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. यवतमाळातील मोठे वडगाव परिसरातील एका महिलेचा डेथ डिक्लीरेशन मेमो (मृत्यूपूर्व जबानी) मंगळवारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आला. त्यावरून मर्ग डायरीमध्ये मृत्यूची नोंद घेण्यात आली. नंतर ती महिला जिवंत असल्याचे माहीत झाल्याने मर्गची नोंद रद्द करण्यात आली.उज्वला राजेश वानखडे रा. शांतीनगर वडगाव या महिलेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी डॉ. प्रीती खंडारे यांनी मेमो तयार केला. तो मेमो वॉर्डबॉय नीलेश खंडाळकर याच्या माध्यमातून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाठविला. पोलिसांनी जबानी घेण्याऐवजी त्या मेमोवरून जिवंत महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद मर्ग डायरीमध्ये घेतली. त्याचा मर्ग क्रमांक ५४/२०२० असा आहे.कागदोपत्री उज्वला राजेश वानखडे या महिलेचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात ती महिला जिवंतच असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तेव्हा अवधूतवाडी पोलिसांनाही धक्का बसला. मर्ग डायरीत मृत्यूची नोंद घेतली आहे, आता काय करायचे तेव्हा पोलिसांनी दाखल केलेला मर्ग परस्पर रद्द केला.या अनागोंदीमुळे वानखडे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले होते. गफलत झाल्याने जिवंत महिलेला कागदोपत्री मृत्यू घोषित करण्याचा प्रकार झाला. अखेर प्रकरण जास्त वाढविण्यापेक्षा सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.सदर महिलेला विषबाधा झाली आहे. त्यामुळे मृत्यूपूर्व जबानी घेण्यासाठी डेथ डिक्लीरेशन अहवाल पाठविला होता. याचा चुकीचा अर्थ घेऊन पोलिसांनी डेथ मेमो समजून मर्ग दाखल केला असावा.- डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेजPoliceपोलिस