लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : झरी तालुक्यताील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये ठेऊन असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला आग लागून त्यात दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या जिनिंगमध्ये दरवर्षीच कापसाला आग लागते. त्यामुळे ही आग लागली की लावण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. कापसाची गंजी लावताना यंत्रातून निघालेल्या ठिणगीने ही आग लागल्याचा दावा सीसीआयचे केंद्रप्रमुख रत्नाकर पोटे यांनी लोकमतशी बोलताना केला. दरम्यान, आग आटोक्यात आली असून आग विझविण्याचे काम सकाळी ११ नंतरही सुरूच होते.
यवतमाळ जिल्ह्यात मुकूटबन येथील भीषण आग: दोन हजार क्विंटल कापूस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:16 IST