शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

मार्इंदे चौकातील एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:41 IST

शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांना एटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे.

ठळक मुद्देप्रयत्न फसला : सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांनाएटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे.मार्इंदे चौकालगतच्या स्टेट बँक शाखेसमोर अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. शनिवारी रात्री दरम्यान अज्ञात आरोपींनी एटीएमचे मुख्य दार व काचा फोडून मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. एटीएम मशीनचा डिस्प्ले तेथील एसी यासह इतर साहित्याचीही अज्ञात आरोपींनी तोडफोड केली. या प्रकरणी अ‍ॅक्सीस बँकेचे संदेश महादेवराव देशमुख यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून अवधूतवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी जांब रोड येथे एकाच परिसरातून घरात ठेवलेले मोबाईल चोरीला गेले. यासह अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या सातत्याने होत आहे. या प्रकरणांचा छडा लावण्याचे आव्हान स्थानिक पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

टॅग्स :atmएटीएमThiefचोर