शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:09 IST

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे.

ठळक मुद्देवादळाचा फटका : दहा दिवसांपासून जनजीवन ठप्प, पीठगिरण्या, पाणीपुरवठा बंद असल्याने हाहाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. सलग दहा दिवसांपासून वीज नसल्याने या गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून दैनंदिन कामकाज ठप्प पडले आहे.दोन दिवसांच्या फरकाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करताना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वीज वितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. शिवाय आवश्यक ते साहित्यही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. सायखेडा, तळेगाव, लोही या फिडरवर असलेल्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने प्रचंड उकाड्यात दिवस व रात्र काढावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना मुबलक पाणी असूनही मान्सूनपूर्व पिकांची लागवड करता आली नाही. एकाचवेळी अनेक गावात बिघाड झाल्याने स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचा संयम ढळत आहे. एकंदरच स्फोटक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा होत असताना वीज पुरवठा नसल्याने लहान मुले व वृद्धांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. लवकर पुरवठा सुरू करण्याची मागणी आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची वीज महावितरण कार्यालयावर धडकवीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तळेगाव फिडरमधील गावांचा वीज पुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, सिंधू राठोड, राजू दुधे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पवार, वहीद खान, रामेश्वर गिरी, बळीराम जाधव, प्रेमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणShiv Senaशिवसेना