शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या मानवीचा काकूनेच केला ‘अमानवी’ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 17:51 IST

२० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देमुलापेक्षा मुलीचा लाड होतो म्हणून द्वेषकट उघड होताच मानसिक रुग्ण असल्याचा पोलिसांपुढे बनाव

यवतमाळ : खुदूखुदू हसणारी तीन वर्षांची मानवी ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. आठवडाभर सर्वत्र शोध घेवून आई-वडील थकले. पोलिसांनीही हात टेकले. आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डुमनी गावातील या घटनेत अखेर रविवारी रात्री धक्कादायक खुलासा पुढे आला. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे. या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

मानवी अविनाश चोले असे मृत बालिकेचे नाव आहे. तर दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले (२८) असे मारेकरी काकूचे नाव आहे. दि. २० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिचे वडील अविनाश आणि आई ममता उर्फ पूजा यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर आर्णी पोलिसांत तक्रार दाखल केली.

मानवीच्या शोधासाठी पोलिसांसह गावकऱ्यांनीही जंगजंग पछाडले. मात्र मानवीचा कुठेही सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी शेजाऱ्यांवरच लक्ष केंद्रित केले. शेवटी रविवारी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कुऱ्हा डुमनी गाव गाठून दिवसभर माग काढला. रात्री ९च्या सुमारास संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. मानवीच्या घराशेजारी राहणाऱ्या चुलत काकूनेच सात दिवसांपूर्वी तिचा खून करून घरातील गव्हाच्या कोठीत तिचा मृतदेह दाबून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाले मात्र चिमुकल्या मानवीचा जीव वाचविण्यात कुणालाच यश आले नाही.

पोलिसांनी तातडीने मानवीची काकू दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिला ताब्यात घेतले आहे, तर मानवीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आला. दीपालीसह कुटुंबातील आणखी दाेघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांंनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केले होते. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, दारव्हा एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ एलसीबी पथक प्रमुख प्रदीप परदेशी, आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव, मनोज चव्हाण, सतीश चौधर, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, विजय चव्हाण आदींनी पार पाडली.

* संबंधित बातमी : तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणामुळे खळबळ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू