शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:00 AM

कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही...

ठळक मुद्देकोरोनामुक्त व्यावसायिकाचा मंत्र उपचारासोबतच स्वत:ची इच्छाशक्ती महत्त्वाची

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही...यवतमाळ जिल्ह्यातील पहिला कोरोनारुग्ण म्हणून ज्यांची नोंद झाली ते रमेश नारायण यमसनवार आपल्या ‘कोरोनामुक्ती’चा मंत्र सांगत होते. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच यमसनवार कुटुंब दुबईवरून परतले आणि कोरोना पॉझिटिव्ह निघाले. पहिल्यांदा रमेश यांना यवतमाळ मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. तर दोन दिवसांनी त्यांची पत्नी जया रमेश यमसनवार याही पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांनाही दाखल करण्यात आले. मात्र अवघ्या काही दिवसात या दोघांनीही कोरोनावर मात केली आज ते आपल्या घरी ठणठणीत आहेत.आपला हा ‘कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ असा ‘सकारात्मक’ प्रवास मांडताना रमेश यमसनवार म्हणाले, आम्ही पहिले-पहिले पेशंट होतो, तेव्हा कोरोनाची लोकांना फारशी माहितीही नव्हती. त्यामुळे गैरसमज खूप होते. कोरोना झाला म्हणजे जणू आम्ही काही गुन्हा केला की काय, असे वातावरण झाले होते. पण इतर आजारांसारखाच हाही एक आजार आहे. तोही बरा होतो. मी आणि पत्नी एकाच वेळी दवाखान्यात उपचार घेत होतो. मी मनाने स्ट्राँग होतो, पण ती जरा हळवी झाली होती. मी तिला सांगायचो.. खचला तो संपला! स्वत:वर विश्वास ठेवायचा. इम्युनिटी टिकवायची. इच्छाशक्ती कायम ठेवायची. टेन्शन घ्यायचे नाही. सारे काही ठिक होईल... या बोलण्यातून धिर मिळायचा... तिलाही अन् मलाही!यमसनवार म्हणाले, डॉक्टर मंडळींनी खूप मेहनत घेतली. आम्ही ‘पॉझिटिव्ह’ असूनही डॉ. मिलिंद कांबळे आमच्या जवळ येऊन विचारपूस करायचे. दैनंदिन ताप चेक करणे, औषधी देणे सुरू होते. रोज अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्या सुरू होत्या. आमचा दुसरा-तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर आम्हाला घरी सोडण्यात आले. १४ दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले. पण आम्ही स्वत:हून ३५ दिवस घराबाहेर निघालोच नाही. या क्वारंटाईन काळात नातेवाईक जेवणाचा डबा आणून द्यायचे, त्यांनाही आम्ही संपर्क टाळण्यासाठी घरात घेतले नाही. मन रमविण्यासाठी घरातल्या घरात व्यायाम करणे, टिव्हीवर आवडते कार्यक्रम पाहणे, जगदंबा देवीची भक्ती करणे हा आमचा दिनक्रम होता. आता ३५ दिवसानंतर मी माझा कृषी केंद्राचा व्यवसायही पूर्वीप्रमाणे सुरू केला आहे.आजारावर निश्चित उपचार नसताना डॉक्टरांची मेहनत, माझी स्वत:ची इच्छाशक्ती, माझ्या परिसरातील लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि जगदंबा देवीची कृपा यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...माझ्यामुळे इतरांना त्रास नको!रमेश यमसनवार म्हणाले, दुबईहून आल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह निघालो अन् रुग्णालयात भरती झालो. पण माझ्या संपर्कात आलेल्या इतरांना काही होणार तर नाही ना, याबाबत सतत चिंता सतावत होती. म्हणून रुग्णालयातून त्या सर्वांना सतत फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत होतो. सुदैवाने माझ्यामुळे इतर कोणालाही लागण झाली नाही, याचे समाधान आहे. आम्ही पती-पत्नी रुग्णालयात असताना आमचा मुलगा सारंग पुण्यात उपचार घेत होता. पण आता आम्ही तिघेही कोरोनामुक्त झालो.मास्क लावणे म्हणजे ९५ टक्के सुरक्षासरकार कितीही प्रयत्न करीत असले तरी आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावलाच पाहिजे. मास्क लावला तर दुसऱ्या कोणत्याच उपायाची गरज नाही. तिच आपली ९५ टक्के सुरक्षा आहे. लोकांनी गर्दीत जाऊ नये, गेलेच तर काळजी घेऊन वावरा. कोरोनामुक्त झाल्यावर मी शहरातील आणि खेड्यातीलही नागरिक पाहिले. पण कोरोनाबाबत खेड्यातील अडाणी माणसेच अधिक जागृत असल्याचे मत यमसनवार यांनी नोंदविले.कोरोना आजार उलटून येत नाहीआम्ही कोरोनामुक्त झालो तरी अनेक लोक आमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा आजार एकदा बरा झाल्यावर पुन्हा उलटून येत नाही. कोरोनामुक्त झालो म्हणजे आम्ही पूर्वीप्रमाणेच ‘सामान्य’ झालो आहोत. क्वारंटाईन पिरेडनंतर आमच्यापासून कोणालाही कोणताही धोका नाही. आम्हाला घाबरणे म्हणजे अंधश्रद्धा बाळगणे होय, असे रमेश यमसनवार म्हणाले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या