शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात मुख्य पाईपलाईन फुटली, अनेक घरांमध्ये शिरले पाणी; नागरिकांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 14:04 IST

रविवारी रात्री ९.४५ वाजता वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तपासणीदरम्यान फुटली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देवाघापूर परिसरात उन्हाळ्यात आला पूरलाखो लिटर पाणी रस्त्यावर, अनेक घरांचे नुकसान

यवतमाळ : शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ३०२ कोटींच्या या योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. रविवारी रात्री ९.४५ वाजता वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तपासणीदरम्यान फुटली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

रस्त्यावरून अक्षरश: पाण्याचे लोट वाहू लागले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. जीवन प्राधिकरणाकडून नव्याने प केलेल्या पाणीपुरवठा योजनेची तपासणी केली जात आहे. या तपासणीमध्ये ठिकाणी पाईपलाईन प फुटत असल्याचे दिसून येते. २०१७ पासून सुरू असलेली ही पाणीपुरवठा त योजना अजूनही पूर्णत्वास आलेली नाही. रविवारी रात्री अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काशीकर महाराज मठ परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली.

घरातील वस्तूचे मोठे नुकसान झाले. पाणीच पाणी वाहू लागल्याने तपासणी करत असलेल्या कामगारांची सुद्धा तारांबळ उडाली, त्यांना काय करावे समजत नव्हते. पूर आल्याने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. पाणी घरात जाऊ नये म्हणून नागरिकांची धडपड सुरू होती. एकूणच प्राधिकरणाच्या कारभाराबद्दल परिसरातील नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पाईपलाईन फुटून आलेल्या पुरात झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :WaterपाणीYavatmalयवतमाळ