शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

चौथीचा महेश जेव्हा मुख्यमंत्री बनतो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:35 IST

अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले!

ठळक मुद्देदप्तरमुक्त : शपथविधी अन् खातेवाटपही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले!थांबा... राजकीय कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा मुख्यमंत्री शाळेपुरता मर्यादित आहे. लवकरच आपल्या इतर मंत्र्यांची नावे जाहीर करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना निवडणुकीचा अभ्यास करता यावा, म्हणून येळाबारा (ता. यवतमाळ) येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमच राबविण्यात आला. त्यातून मुख्यमंत्रीच नव्हेतर, मतदान अधिकारी, मतदान केंद्र अधिकारीही विद्यार्थीच बनलेत.या शाळेत प्रत्येक आठवड्यात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी मुलांनी दप्तर न आणता, विविध स्पर्धा, गायन-वादन, व्यायाम, कवायत असे उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत २१ जुलैच्या शनिवारी ‘शालेय मंत्रिमंडळासाठी निवडणूक’ घेण्यात आली. प्रत्यक्ष गावात प्रचार कसा केला जातो, याचाही विद्यार्थ्यांना अनुभव देण्यात आला. यात प्रत्यक्ष मतदान कक्ष साकारण्यात आला. आठ विद्यार्थी उमेदवार झाले.मुख्याध्यापक पांडुरंग भोयर, शिक्षक शिवचंद्र गिरी, देवेंद्र लोटे, किशोर डाफे, पद्मा वैद्य, शशिकला टेकाम आदींनी हा उपक्रम राबविला.एक मत ‘नोटा’लाशाळेचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी झालेल्या मतदानात दुसरी, तिसरी आणि चौथीच्या एकूण ५७ विद्यार्थ्यांनी मतदान केले. त्यातील सर्वाधिक मते घेऊन महेश इंगोले मुख्यमंत्री झाला. विशेष म्हणजे, ५७ पैकी एका विद्यार्थ्यांने चक्क ‘नोटा’चा (एकही उमेदवार पसंत नाही) पर्याय निवडला. मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांचा शपथविधीही मंगळवारी पार पडला आणि खातेवाटपही झाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीSchoolशाळा