Maharashtra Election 2019 ; मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 06:00 AM2019-10-21T06:00:00+5:302019-10-21T06:00:04+5:30

वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे.

Maharashtra Election 2019 ; Voters Raja will give Mahakaul today! | Maharashtra Election 2019 ; मतदारराजा आज देणार महाकौल!

Maharashtra Election 2019 ; मतदारराजा आज देणार महाकौल!

Next
ठळक मुद्देनिवडणूक प्रक्रियेसाठी १ हजार ३८ वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क । यवतमाळ। जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षितरीत्या पार पडावी यासाठी झोन तयार करण्यात आले आहे. वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी दीड तास अगोदर मॉक पोल (अभिरुप मतदान) घेऊन मतदान यंत्राची पडताळणी केली जाणार आहे. दोन हजार ४९९ मतदान केंद्रावर २१ लाख ७५ हजार ६६५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे.

कडेकोट बंदोबस्त
१,८५० स्थानिक पोलीस, १,१०१ होमगार्डस्, केंद्रीय दलाच्या ७ कंपनी तसेच राज्य राखीव दलाची एक कंपनी, लगतच्या तेलंगणा राज्यातून ६०० होमगार्ड, १ डीवायएसपी, ३० अधिकारी, ३८२ पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात केले जाणार आहे. एकूण ४,४०७ पोलीस आहेत.

जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विधानसभा मुख्यालयी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.

मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर झाली का?
सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे अपर कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.


यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे ओळखपत्र, बँक, पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, आधार कार्ड

Web Title: Maharashtra Election 2019 ; Voters Raja will give Mahakaul today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.