शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; आजी-माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आहेत. परंतु प्रा. उईके व प्रा. पुरके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. पुरके यापूर्वी शिक्षणमंत्री होते तर उईके आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत. मात्र दोघांच्या वागण्यातील विसंगती मतदारांच्या नजरेतून सुटलेली नाही. प्रा. वसंत पुरके यांची भाषणशैली उत्कृष्ट आणि टाळ्या घेणारी असली तरी भाषणातून त्यांच्याकडून घेतले जाणारे चिमटे अनेकदा उपस्थितांना खटकतात.

ठळक मुद्देउईकेंच्या साधेपणाची मतदारांना भुरळ : काँग्रेससाठी सर्व वजनदार गट एकवटले

उच्चशिक्षित, प्राचार्य, डॉक्टर आणि कॅबिनेट मंत्री असूनही अगदी साधेपणाने राहणारे, कोणत्याही ज्येष्ठाचा भरचौकातही पाया पडून आशीर्वाद घेणाऱ्या भाजप उमेदवार अशोक उईके यांची मतदारांना भुरळ पडली आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्याशी थेट होतो आहे.राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आहेत. परंतु प्रा. उईके व प्रा. पुरके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. पुरके यापूर्वी शिक्षणमंत्री होते तर उईके आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत. मात्र दोघांच्या वागण्यातील विसंगती मतदारांच्या नजरेतून सुटलेली नाही. प्रा. वसंत पुरके यांची भाषणशैली उत्कृष्ट आणि टाळ्या घेणारी असली तरी भाषणातून त्यांच्याकडून घेतले जाणारे चिमटे अनेकदा उपस्थितांना खटकतात. त्यातूनच पुरकेंबाबत मतदारसंघामध्ये एक विरोधाचा प्रवाह निर्माण झाला आहे. संत साहित्याचे दाखले देणारे पुरके अभ्यासू राजकारणी म्हणून जसे परिचित आहेत तसेच ते फटकळ आणि सामान्यांपासून अंतर राखून राहत असल्याचेही सांगितले जाते. त्या तुलनेत वागणुकीत भाजपचे अशोक उईके मतदारांच्या नजरेत सरस ठरतात. आमदार, मंत्री असूनही त्यांनी आपला साधेपणा सोडलेला नाही. टू-बीएचके मधील त्यांचा संसार अनेकांनी पाहिला आहे. घरातील आणि कुटुंबातील साधेपणाचीही मतदारांमध्ये चर्चा होते.उईके यांना पर्याय देण्याचाही जिल्हा भाजपातील दुसºया शक्ती केंद्राने प्रयत्न केला. त्याला सहकार क्षेत्रातूनही ‘बुस्ट’ देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्या सर्वांवर कॅबिनेट मंत्रीमंडळातील वर्णीने मात केली. कालपर्यंत उईकेंच्या विरोधात असलेले घटक आज त्यांच्या सोबत असल्याचे सकारात्मक चित्र भाजपात पहायला मिळते आहे. आतापर्यंत अलिप्त असलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनीही बुधवारी उईकेंच्या प्रचारार्थ मतदारांना दर्शन दिले. जिल्ह्यात भाजपची हमखास निवडून येणारी जागा असे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांकडून केले जात असले तरी ही लढत पाहिजे तेवढी उईकेंना सोपी राहिलेली नाही. कारण गेल्या निवडणुकीत मतदारसंघात सामाजिक वजन असलेले अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, प्रवीण देशमुख आदी घटक आता उघडपणे उईकेंसोबत राहिलेले नाही. उलट त्यांनी एकजुटीने काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न चालविल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत पुरकेंना उमेदवारी नको म्हणून विरोध करणारे हे प्रभावी घटक पक्षहित डोळ्यापुढे ठेऊन एकवटल्याचे दिसते. त्यांच्या एकजुटीमुळे मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळेच राळेगाव मतदारसंघाची लढत ही काँग्रेस व भाजप अशी थेट होणार असल्याचे मानले जाते. प्रहारचे गुलाब पंधरे, वंचित बहुजन आघाडीचे माधव कोहळे हेसुद्धा मतविभाजनाच्या दृष्टीने प्रमुख पक्षांसाठी अडचणीचे उमेदवार ठरणारे आहेत. बाभूळगाव व राळेगावातील भाजपचा नाराज गट खरोखरच पक्षाच्या उमेदवारासाठी काम करतो आहे का याबाबत साशंकतेने पाहिले जात आहे. अशीच साशंकता काही प्रमाणात काँग्रेसच्या वजनदार घटकांबाबतही बोलून दाखविली जात आहे. 

टॅग्स :ralegaon-acराळेगाव