जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:09 PM2018-12-06T21:09:29+5:302018-12-06T21:11:27+5:30

येथील जिल्हा न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Mahaparinirvan day in district court | जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जिल्हा न्यायालयातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर, न्या. टी.एस. अकाली, न्या. मोहिनुद्दिन, न्या. खुने, न्या. राजुरकर व न्यायालयातील सर्व न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी, वकील उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत मोलाचे योगदान देशाला दिले आहे. आज देश त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालविणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मिनाज मलनस, अ‍ॅड. योगिता ढोक, अ‍ॅड. सविता ढोक, अ‍ॅड. प्रीती इंगळे, अ‍ॅड. धनंजय मानकर, अ‍ॅड. रवी अलोणे, अ‍ॅड. अभिजित बायस्कर, अ‍ॅड. प्रवीण हर्षे, अ‍ॅड. आकाश मंगतानी, अ‍ॅड. नरेंद्र मेश्राम यांनी पुढाकार घेतला. संचालन अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांनी केले.

Web Title: Mahaparinirvan day in district court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.