शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट सांग तू मले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:42 IST

महादेव पुसे नंद्याले, कर्जमाफीचा बजेट तू सांग मले,.....

ठळक मुद्देझडत्यांतून टीका : शेतकरी आत्महत्या रोखण्याची पोळ्यात शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महादेव पुसे नंद्याले,कर्जमाफीचा बजेट तू सांग मले,नंदी म्हणे देवा इचारू नका,आॅनलाईनच्या पाचरीन केलाफार मोठा धोका,कास्तकार येडे झाले,काम्पूटर मालुम नाही त्याले,एक नमन कवडा पार्वती हर बोला हरहर महादेवयवतमाळच्या पोळ्यात सद्यपरिस्थितीवर वास्तववादी झडत्यांनी चांगलीच रंगत आणली. झडत्यातून झणझणीत अंजन घालत सरकारवर सडकून टीका केली. तर शेतकरी आत्महत्या रोखण्याची पोळ्यात नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी उपस्थिताना शपथ दिली. उत्कृष्ट बौलजोडी स्पर्धेत मोहाच्या उमेश गायकी यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.येथील आझाद मैदानावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कांचन चौधरी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सभापती नित्यानंद गिरी, नगरसेवक गजानन इंगोले, दिनेश चिंडाले, राजेंद्र डांगे, डॉ. सुरेंद्र पदमावार, डॉ. हटकर, डॉ. वटाणे, पिंटू बांगर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर डेरे उपस्थित होते.यवतमाळ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने आयोजित या स्पर्धेत गतवर्षीच्या तुलनेत संख्येने कमी जोड्या दाखल झाल्या होत्या. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा १० हजाराचा पुरस्कार दिनेश तिवाडे यांनी पटकावला. तिसरा क्रमांक पुरस्कार मडकोना येथील जोडीने, चौथा क्रमांक पंजाब मेश्राम यांच्या बैलजोडीने, पाचवा क्रमांक भारीचे मनोहर चव्हाण यांनी पटकावले. तर प्रोत्साहनपर बक्षीस निखील सालोडकर, अनिल मिश्रा, अरूण शिर्के, दिपक सुलभेवार, किरण मिसाळ यांच्या बैलजोडींना देण्यात आले.यावेळी सरकारवर टीका करणाºया झडत्या सतीश त्रिवेदी यांनी सादर केल्या. यावेळी गजाली यांनी पोळ्याच्या सणावर कविता सादर केल्या. तर काही शेतकºयांनी परंपरागत झडत्या म्हटल्या.सरकारी बँका मंदी बाबू,झडत्या म्हणे दाबू दाबू,आज आवतन घ्यापण उद्या जेवाले नका येवू,कास्तकार बैलापेक्षा निपटार झाला,आॅनलाईनचा सारा बोºया वाजला,एक नमन गौरा पार्वती हर बोलाहरहर महादेव.असा गजर मैदानवार सारखा घुमत होता.