शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वाघापूरला कमी दाबाने पाणी

By admin | Updated: May 18, 2017 00:51 IST

यावर्षी वाघापूर परिसरात तीव्र अशी पाणीटंचाई सध्या तरी नाही. आठवड्यातून दोनवेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येतात.

टिल्लू मशीनचा उच्छाद : पहिल्या माळ्यावरही पाणी पोहचत नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यावर्षी वाघापूर परिसरात तीव्र अशी पाणीटंचाई सध्या तरी नाही. आठवड्यातून दोनवेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळते. परंतु या नळांना दाब कमी असल्यामुळे पाणी भरायला चांगलाच वेळ लागतो. तसेच वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासूनच वाघापूर परिसरात तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. त्यामुळे नगर परिषद व काही समाजसेवींकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे सध्या तरी आठवड्यातून दोनवेळा नळाला पाणी येत आहे. तसेच बोअरवेल आणि हातपंपांनाही काही प्रमाणात का होईना पाणी आहे. त्यामुळे मे महिन्यातील पाणीटंचाई फारसी जाणवत नसल्याचे जयविजय चौक, बोरुंदिया नगर, पटवारी कॉलनी, माधव नगर या परिसरातील नागरिकांनी सांगितले. तर नळाच्या पाण्याला दाब नसल्यामुळे टेकडी परिसर, राऊत नगर, महात्मा फुले सोसायटी या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. या भागातील अनेक बोअरवेलही कोरड्या पडल्या. हातपंपांचीसुद्धा दूरावस्था आहे. अशा स्थितीत येथील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जय विजय चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक फ्लॅट स्किम मध्ये राहतात. या ठिकाणी ग्राऊंड फ्लोअर सोडल्यास वरच्या कोणत्याही मजल्यावर पाणी पोहचत नाही. त्यामुळे नागरिकांना खालून पाणी न्यावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने एक गुंड भरायलाही १५ ते २० मिनिटे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. या परिसरातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली असता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिलासादायक चित्र असल्याचे ते म्हणाले. अद्याप नागरिकांकडून टँकरची मागणी झाली नसली तरी काही दिवसातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून एकदाच नळ सोडले जाईल, त्यानंतर मात्र गोंधळ उडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नगर परिषदेकडून अद्याप टँकरबाबत आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे वेळेवर मोठी पंचायत निर्माण होऊ शकते. वाघापूरसह शहरातील पिंपळगाव, वडगाव, उमरसरा, भोसा, मोहा आदी परिसरातील सध्याची आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नगर परिषदेने तयारीत राहणे गरजेचे आहे. आता संपूर्ण भिस्त लोहाऱ्याच्या टाकीवर लोहारा बायपासवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नवीन टाकी बांधण्यात आली. मागे या टाकीची ट्रायल घेण्यात आली होती. त्यामध्ये समाधानकारक परिणाम दिसून आले नाही. त्यामुळे आवश्यक त्या सुधारणा करण्यात येऊन सध्या ही टाकी पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. लोहारा आणि वाघापूर परिसरालाही या टाकीचा मोठा फायदा होणार आहे. सध्या यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणातच पाणी नसल्याने ही टाकी भरणे आणि या टाकीतून पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यासाठी पावसाळ्याचीच वाट पाहावी लागेल. परंतु एकदा ही टाकी सुरू झाली की वाघापूर आणि लोहारा परिसरातील नागरिकांना चांगला दिलासा मिळणार आहे.