शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बेवारस मृतदेहावरून उलगडले प्रेमप्रकरणातून झालेले हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:00 IST

केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत मनोज भाबट हे गेल्या काही दिवसांपासून घरी परतले नव्हते. ते गावी गेल्याची माहिती मनोज भाबट यांची पत्नी मोनिका भाबट (३७) यांनी पोलिसांना दिली. त्याचवेळी देवळीचे ठाणेदार व तपास अधिकारी धनंजय सायरे यांना मोनिका यांच्यावर संशय आला. पती पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्याशी संपर्क होत नाही, असे असतानाही तिची वर्तणूक एक पत्नी म्हणून अतिशय सामान्य होती.

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वाफगाव शिवारात रोडच्या पुलाखाली कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान होते. सलग चार दिवस मृतदेह सापडलेल्या परिसरात कसून शोध घेण्यात आला. तेव्हा एक आधारकार्ड आढळले. त्या आधार कार्डवरील व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. तो यवतमाळातील रहिवासी असून नागपूर येथे सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली.केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत मनोज भाबट हे गेल्या काही दिवसांपासून घरी परतले नव्हते. ते गावी गेल्याची माहिती मनोज भाबट यांची पत्नी मोनिका भाबट (३७) यांनी पोलिसांना दिली. त्याचवेळी देवळीचे ठाणेदार व तपास अधिकारी धनंजय सायरे यांना मोनिका यांच्यावर संशय आला. पती पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्याशी संपर्क होत नाही, असे असतानाही तिची वर्तणूक एक पत्नी म्हणून अतिशय सामान्य होती. पोलिसांनी मोनिकावर लक्ष केंद्रित करून तिच्यावर बारीक नजर ठेवली. इतकेच नव्हे तर ती मोबाईलद्वारे कोणाच्या संपर्कात आहे, यावरही पोलिसांचा वाॅच होता. मोनिका ही प्रमोद माधव रन्नावरे (३९) रा.वडगाव याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी परस्परच प्रमोदला उचलले. त्याने गुन्ह्याची कबुली देत मनोज भाबट याचा खून केल्याचे सांगितले. या गुन्ह्यात त्याने नितीन मधुकर घाडगे (२७) रा.वडगाव, आशिष रामदास कठाळे रा.करळगाव यांची मदत घेतल्याचेही सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील शस्त्र, रक्ताने माखलेले कापड, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. त्यानंतर मोनिका भाबट हिला ताब्यात घेतले. तब्बल २९ साक्षीदार वर्धा सत्र न्यायालयात हजर केले. त्यावरून २७ सप्टेंबर २०१६ रोजी आरोपींना जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींनी या शिक्षेच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली; मात्र तिथेही पोलिसांचा योग्य तपास व दोषारोपपत्रामुळे न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी वर्धा सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत आरोपींची जन्मठेप कायम केली. केवळ योग्य दोषारोपपत्र व तपासामुळे आरोपी कारागृहात आहेत.

तपासाकडे होते दोन जिल्ह्यांचे लक्ष केंद्रीय राखीव पोलीस बलात कार्यरत असलेले मनोज भाबट (रा.सीआरपीएफ कॅम्प, नागपूर) यांची पत्नी मोनिका भाबट व तिचा प्रियकर प्रमोद माधव रन्नावरे (रा.वडगाव) यांनी कट रचून १ ऑक्टोबर २०१३ रोजी चालत्या वाहनात वार करून हत्या केली. मृतदेह वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाफगाव शिवारातील पुलाखाली फेकून दिला. या बेवारस मृतदेहाच्या तपासाकडे दोन जिल्ह्यांचे लक्ष होते.

खटल्यातील सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यातदेवळी पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या हत्येमागे पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचे दोषाराेपपत्र वर्धा सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची ट्रायल सुरू झाली असताना आरोपी निर्दोष सुटतील, या प्रकरणात शिक्षा होणार नाही, असे मृताच्या बहिणीला सरकारी वकिलाने सांगितले होते. दरम्यान, या सरकारी वकिलाला तीन लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली. नंतर २७ सप्टेंबर २०१६ ला सत्र न्यायालयाने २९ साक्षीदारांच्या तपासणीनंतर आरोपींना जन्मठेप ठोठावली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस