शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: January 6, 2015 23:10 IST

वणी तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. ते तालुक्याचा ठिकाणी

नांदेपेरा : वणी तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. ते तालुक्याचा ठिकाणी राहून कार्यालयाचा कारभार हाकत आहे. परिणामी जनतेची कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना कामासाठी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या शोधासाठी आर्थिक खर्च व पायपीट करावी लागत आहे.शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यालयी राहून त्यांनी जनतेची कामे करावीत, असा हेतू आहे. मात्र या हेतूलाच आता तिलांजली दिली जात आहे. अनेक कर्मचारी मुख्यालयी भेटणे दुरापास्त झाले आहेत. शिक्षक आणि तलाठी यांनी तर मुख्यालयाला खो दिला आहे. ग्रामीण भागातील शाळांवर कार्यरत बहुतांश शिक्षक तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. शाळेत १० वाजता पोहोचणे व सायंकाळी ५ वाजता परत जाण्यासाठी त्यांची घाई सुरू असते. सायंकाळी ५ वाजताच शिक्षकांना घराची ओढ लागते. कधी एकदाचे ५ वाजतात, याची त्यांना प्रतीक्षा असते. यात महिला कर्मचारी तर सतत घडाळ्याकडेच बघत बसतात. त्यामुळे घराची ओढ लागलेल्या या शिक्षकांकडून उत्कृष्ठ ज्ञानार्जनाच्या कार्याची अपेक्षा पालक करूच शकत नाहीत. संबंधित गावात घर मिळत नसल्याची ओरड त्यांच्याकडून होते. बहुधा ती खरीही असावी. मात्र अनेक गावांमध्ये सहज घर मिळू शकते. तरीही तेथे कुणी राहात नाहीत. मात्र मुख्यालयी राहात असल्याचे खोटे दाखले ग्रामपंचायत व शिक्षण समितीचा पदाधिकाऱ्यांना हाताशी पकडून दिले जाते. या दाखल्यावरूनच त्याचे वेतन निघते.तलाठीसुद्धा मुख्यालयी राहात नाही. एका तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार असतो. त्यामुळे एका गावातील ग्रामस्थाने विचारले, तर ते दुसऱ्या गावात असल्याचे सांगतात. दुसऱ्या गावातील ग्रामस्थाने विचारले, तर तिसऱ्या आणि तिसऱ्याने विचारले तर चौथ्या गावात असल्याचे ठोकून देतात. प्रत्यक्षात बहुतांश तलाठी यापैकी कोणत्याच गावात नसतात. ते तालुक्याच्या ठिकाणी ठाण मांडून दिसतात. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक तालका स्थळी पोहोचून कामे करवून घ्यावी लागतात. यात त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात.वणी तालुक्यात शासनाने कर्मचाऱ््यांना नक्षल भत्ता लागू केला आहे. या सोभतच कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताही मिळतो. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून हे भत्ते पदरात पाडून घेतले जातात. हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र तरीदेखील कर्मचाऱ्यांचा घरभाडे अथवा व नक्षल भत्ता कपात करण्याची तसदी ते घेत नाहीत. कारण कर्मचारी संघटना बळकट असतात. त्यांचा रोष ओढवून घेणे त्यांना कठीण जाते.शासकीय सेवेत रूजू होताना मुख्यालयी राहून काम करण्याची अट असते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असताना केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनागोंदी कारभार सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, हासुद्धा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीत जनता व शासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी तर कहर केला आहे. दुपारी १२ वाजता गावात पोहोचणे, ३ वाजता परत जाणे, असे प्रकार सर्रास सुरू आहे. बहुतांश ग्रामसेवकही मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे त्यांना गाव, विकास, गावाची कामे जनतेच्या समस्यांशी काहीही देणे-घेणे असल्याचे दिसत नाही. (वार्ताहर)