शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलितील भंगारावर चोरट्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:37 IST

वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाणींमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भंगारावर चोरट्यांची पुन्हा एकदा नजर पडली आहे. बुधवारी वणी पोलिसांनी जत्रा मैदान परिसरातून जप्त केलेले अडीच लाख रूपये किंमतीचे भंगार हे वेकोलितीलच असावे, अशी शंका व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्यादिशेने तपास चालविला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा वॉच : वणीत चोरीतील अडीच लाखांच्या भंगारासह पीक-अप जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाणींमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भंगारावर चोरट्यांची पुन्हा एकदा नजर पडली आहे. बुधवारी वणी पोलिसांनी जत्रा मैदान परिसरातून जप्त केलेले अडीच लाख रूपये किंमतीचे भंगार हे वेकोलितीलच असावे, अशी शंका व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्यादिशेने तपास चालविला आहे. तूर्तास एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.येथील जत्रा मैदान परिसरात एम.एच.३४-एम.५७४२ क्रमांकाच्या पीक-अप वाहनात चोरीचे भंगार आणण्यात आले असून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची गोपनिय माहिती वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यांनी लगेच डी.बी.पथकाला घटनास्थळाकडे रवाना केले. त्यावेळी जत्रा मैदानात उपरोक्त क्रमांकाचे पीक-अप वाहन उभे असल्याचे दिसून आले. त्या वाहनाची झडती घेतली असता, वाहनात टिनपत्रे, मोठे लोखंडी वॉल, लोखंडी पाईप, यासह विविध लोखंडी साहित्य आढळून आले. त्याचे वजन केले असता, दोन टन ९०० किलोचे हे भंगार चोरीतील असल्याची शंका येताच, पोलिसांनी पीक-अप वाहनात बसून असलेल्या अरूण मारोती गवते (२७) रा.गोकुलनगर याला अटक केली. याप्रकरणी वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई डी.बी.पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, बाळा मोहाडे, नितीन सलाम, अमित पोयाम, दीपक वडस्कर, प्रशांत आडे यांनी केली. वणी परिसरात १२ कोळसा खाणी आहेत. त्यापैकी बहुतांश कोळसा खाणी बंद आहे. या बंद कोळसा खाणीत कोट्यवधी रूपयांचे भंगार पडून आहे. मध्यंतरी घुग्गूस, चंद्रपूर यासह वणी परिसरातील भंगार चोरट्यांच्या टोळ्यांनी अक्षरश: या कोळसा खाणींमध्ये धुडगूस घातला होता. लाखो रूपयांचे भंगार लंपास केले. ही बाब लक्षात आल्यानंतर वेकोलिची सुरक्षा यंत्रणा व पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाया करून भंगार चोरीवर नियंत्रण मिळविले होते. वणी तालुक्यातील कुंभारखणी येथील भूमिगत कोळसा खाणीतून मागील काही महिन्यात लाखो रूपयांचे भंगार पळविण्यात आले. भंगार चोरणाऱ्या या सशस्त्र टोळ्या वेकोलित शिरून सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत भंगार पळवित होते.भंगार चोरीच्या गोरखधंद्यात गुंडांचा शिरकाववणी परिसरात असलेल्या वेकोलिच्या खाणीतून भंगार चोरी करण्यासाठी निर्माण झालेल्या टोळ्यांमध्ये गुुंडांचे प्रमाण अधिक आहे. या गुंडांच्या शिरावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या व्यवसायातून हे गुंड लाखोंची कमाई करीत आहेत. घुग्गूसमधील चोरट्यांची संख्या अधिक आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस