शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; भाजप बंडखोरामुळे निवडणुकीत रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:04 IST

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम : युतीतील नेत्यांकडूनच ‘बुस्ट’वर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.भाजपाचे पी.बी. आडे माघार घेतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नही झाले. मात्र त्यांनी थांबण्यास नकार दिला. त्यांनी थांबू नये म्हणून त्यांना समाजातून सर्वच पक्षात विखुरलेल्या प्रमुख चेहऱ्यांकडून पाठबळही लाभले. त्यामुळेच आडे यांचे रिमोट भाजपा-शिवसेना युतीतील नेत्यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.भाजपाचे बंडखोर पी.बी. आडे नेमके कुणासाठी फायद्याचे व कुणासाठी तोट्याचे यावर आता जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. बंजारा समाजाचे पाठबळ हा आडे यांचा एकमेव प्लस पॉर्इंट आहे. मात्र आडे केवळ समाजाच्या भरवशावर निवडून येणार कसे हासुद्धा प्रश्नच आहे. आडेंची उमेदवारी शिवसेनेच्या हक्कांच्या मतांना सुरुंग लावणारी ठरू शकते. कारण आडेंना मिळणारी मते ही शिवसेनेला मिळाली असती. ती मते काँग्रेसकडे वळली नसती. आडे नसते तर या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांना पसंती दर्शविली असती. मात्र बंजारा समाजाची बहुतांश मते आडेंच्या मागे राहू शकतात. या उलट काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारा कोणताही मोठा उमेदवार रिंगणात नाही. काँग्रेसची दलित, मुस्लीम, कुणबी, ओबीसी ही हक्काची व्होट बँक कायम आहे. कुणबी समाजाची मते काँग्रेस व शिवसेना या दोन उमेदवारांमध्ये विभागली जातील, असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात ती शक्यता कमी आहे. कारण कुणबी समाजाला यावेळी नवा पर्याय निर्माण झाला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या बाजूने दिसणारे कुणबी समाजातील प्रमुख चेहरे आता काँग्रेसच्या रॅलीत सहभागी असल्याचे पहायला मिळत आहे. आडे नसते तर बंजारा समाजाची मते काँग्रेसकडे गेली असती हा शिवसेनेचा समज खोटा ठरण्याची दाट शक्यता आहे. एकूणच भाजपाच्या बंडखोरामुळे या लोकसभा मतदारसंघात रंगत निर्माण झाली आहे. ‘बुस्ट’ देणारे युतीतील नेते अखेरपर्यंत आडेंच्या मागे राहतात का यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.२४ उमेदवार रिंगणात, दोन बॅलेट युनिट लागणारलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आता २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी सात उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणातील उमेदवारांची संख्या २६ होती. २४ उमेदवारांमुळे दोन बॅलेट युनिट लागणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा