शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

Lok Sabha Election 2019; वणी विधानसभा क्षेत्रात ३२५ मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 21:58 IST

११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

ठळक मुद्देसात केंद्र अतिसंवेदनशील : एक हजार ५२४ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.११ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन दाखल करण्याला सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी विधानसभा क्षेत्रात सुरू झाली. मंगळवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जवळपास ३२५ मतदान केंद्र आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये विद्युत व्यवस्था नसल्याने निवडणूक विभागातर्फे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सात अतिसंवेदनशील केंद्रामध्ये वणी तालुक्यातील तरोडा व भालर या केंद्राचा समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी एक हजार ५२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद शिक्षक, प्राध्यापक, वेकोलि कर्मचारी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकुण दोन लाख ८२ हजार ५६४ मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील ३२ मतदान केंद्र संवेदनशिल असून या केंद्रावर चित्रीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या संवेदनशिल केंद्रामध्ये राजूर, चिखलगाव, घोन्सा, भालर, उकणी, तरोडा, कुरई, झरी तालुक्यातील कुंभा, नवरगाव, वेगाव या केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर अधिक प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी यासाठी ३० राखीव पोलिसांचे पथक गठीत केले आहे. तसेच वणी व शिरपूर पोलीस ठाण्यातील ५६ पोलीस कर्मचाºयांची ११३ मतदान केंद्रांवर नजर असणार आहे.केळापूर-आर्णी क्षेत्रात ३७३ मतदान केंद्रचंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या आर्णी-केळापूर विधानसभा क्षेत्रातील ३७३ केंद्रावर मतदान होणार आहे. विधानसभा क्षेत्रातील २९३ गावांत एकूण तीन लाख पाच हजार ७६४ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ५८ हजार ४४ पुरूष मतदार, तर एक लाख ४७ हजार ७१७ महिला मतदार आहेत. तालुक्यातील ८० गावे या मतदार संघाला जोडली असून घाटंजी तालुक्यातील १०८ गावे व आर्णी तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे. घाटंजी तालुक्यातील १३३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून आर्णी तालुक्यात १४० व केळापूर तालुक्यात १०० मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019