लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील गावखेड्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या वाढली आहे. अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेच्या नेतृत्वात सोमवारी येथील वीज कार्यालयावर धडक देत कार्यालयाला कुलूप ठोकले.गेल्या १५ दिवसांपासून अंतरगाव येथे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात जगावे लागत आहे. दीड महिन्यांपासून येथे तीन वेळा ट्रान्सफार्मर लावण्यात आले. परंतु ट्रान्सफार्मर कार्यान्वित होतानाच जळून खाक झाले. नादुरुस्त ट्रान्सफार्मर अंतरगावला जाणीवपूर्वक पाठविण्यात आल्याचा गावकºयांचा आरोप आहे.तसेच कारेगाव येथेही तीन महिन्यांपासून ट्रान्सफार्मर बंद आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज कर्मचाºयांनी दखल घेतली नाही. शेवटी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य रवी राठोड यांच्या नेतृत्वात दोन्ही गावातील शेतकºयांनी वीज कार्यालयावर धडक दिली. संतापलेल्या शेतकºयांनी वीज कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अधिकारी ए.बी. पवार, सहायक उपअभियंता पी.जे. राठोड यांनी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासन न पाळल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
आर्णी वीज कार्यालयाला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:47 IST