शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या बछड्यांचे लोकेशन पांढरकवड्यातच, ‘एपीसीसीएफ’ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:16 IST

नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली आहे.

पांढरकवडा (यवतमाळ) - नरभक्षक वाघीण अवनीच्या बछड्यांचे ४ नोव्हेंबरनंतर वनखात्याला लोकेशनच मिळाले नसल्याचे बोलले जात असले तरी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी ही बाब नाकारली असून गुरुवारी १५ नोव्हेंबर रोजीच सकाळी या दोनही बछड्यांचे वनखात्याला दर्शन झाल्याचे स्पष्ट केले आहे.१३ शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणा-या नरभक्षक वाघीण अवनीला गोळी घालून ठार करण्यात आले. तेव्हापासून तिचे बछडे दिसेनासे झाले होते. त्यांचे वय अवघे दहा ते अकरा महिने असल्याने त्यांना मोठी शिकार करता येत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार सुरू असावी, असा अंदाज वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहे. काहींनी तर या बछड्यांनाही वनखात्याने संपविले नाही ना, अशी शंका व्यक्त केली. त्यासाठी ४ नोव्हेंबरनंतर वरूड डॅमनंतर या बछड्यांचे दर्शन झाले नसल्याचा हवाला वन्यजीवप्रेमींकडून दिला गेला. परंतु अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये (वन्यजीव नागपूर) यांनी अवनीचे दोनही बछडे सुरक्षित असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. सुरक्षित पकडण्याची व्यूहरचनालिमये म्हणाले, वाघाचे हे दोनही बछडे पांढरकवडा तालुक्यातच आहे. गुरुवारी सकाळी ५ ते ६ वाजतादरम्यान तालुक्यातील विहीरगाव येथे या दोन्ही बछड्यांचे लोकेशन मिळाले. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी वन खात्याची यंत्रणा तैनात आहे. मात्र मोठ्या संख्येने मनुष्यबळ लावता येत नाही. त्यामुळे गोंधळून हे बछडे दूर कोठे निघून जाण्याचा धोका असतो. त्यांना जंगलातच अन्न मिळावे म्हणून ४५ ठिकाणी पिंजरे लावून त्यात बकरी, डुकराचे पिल्ले व मांस ठेवण्यात आले आहे. बछडे मांस खाण्यासाठी पिंज-यात येताच त्यांना सुरक्षितरित्या पकडण्याची वन खात्याची व्यूहरचना आहे. या पिंज-यांमध्ये जनावरांची पिल्ले बांधून ठेवण्यात आली आहे. ते अन्नासाठी नेमक्या कोणत्या ठिकाणी वारंवार येतात, हे तपासले जात आहे. त्यावर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्यानंतर योग्यवेळी या बछड्यांना बेशुद्ध केले जाणार असल्याचे सुनील लिमये यांनी सांगितले. दिल्लीचे पथक रवानाअवनीच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून आलेली चमू गुरुवारी सायंकाळी रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणYavatmalयवतमाळ