शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पुसद शहरवासीयांची जीवनदायिनी पूस धरणात ४६ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:00 AM

दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे.

ठळक मुद्देपाऊस परतीच्या मार्गावर । उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावण्याची चिन्हे

अखिलेश अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पावसाळा सुरू होऊन साडे तीन महिने लोटले. आता पाऊस परतीच्या मार्गावर आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे. परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट बळावणार आहे.पूस प्रकल्पाच्या जलसाठ्यात सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात वाढ झाली नाही. मागील वर्षी ऑगस्टमध्येच धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा धरणात केवळ ४६.७० टक्के पाणी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. येथून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर वनवार्ला येथे ‘वसंत सागर’ म्हणजे पूस धरण आहे. हे धरण पुसदकरांसाठी जीवनदायीनी आहे. मागील १८ वर्षांची आकडेवारी बघितली तर सातदा धरण ओव्हर फ्लो झालेच नाही.दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगाम बहरला, तरी उन्हाळ्यात पुसदकरांना दुष्काळाचे चटके तर बसणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला.गेल्यावर्षी पूस धरणासह गाव तलाव, शेततळे, वनतळे, विहिरी, विंधन विहिरी व अन्य स्त्रोत तुडूंब भरले होते. यावर्षी पिकांना संजीवनी देणारा पाऊस पडला. खरीप हंगाम चांगला आहे. मात्र अद्याप पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहे. खरीप पिके चांगली आहे. मात्र रब्बीच्या पिकांचे काय, असा प्रश्न आहे. पूस धरणाच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाला की प्रकल्पाचा जलस्तर झपाट्याने वाढतो. मात्र यंदा नदी पात्राच्या खोऱ्यात चांगला पाऊस झाला नाही.वारा धरण झाले ‘ओव्हरफ्लो’पूस धरणाचा जलसाठा सप्टेंबर महिन्यात थोडा फार वाढला. २१ सप्टेंबरला ४६.७० टक्के जलसाठा आहे. पूस धरणाच्या वरील वारा धरण २० ऑगस्टलाच ओव्हर फ्लो झाल्याने आता पूस धरणाचा जलसाठा निश्चित झपाट्याने वाढेल, अशी माहिती पालिकेचे पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांनी दिली.

टॅग्स :Damधरण