शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

ऑनलाईन व्यवहार जरा जपून, 117 जणांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो. आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात्यावर पैसे पाठवा, असे सांगितले जाते. अशावेळी ग्राहकांनी पैसे पाठवू नये.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ऑनलाईन व्यवहारात पैसा दिसत नाही. यामुळे त्याचे मूल्यही नागरिकांना राहिलेले नाही. हाच धागा पकडून सायबर क्राईम वाढले आहे. जिल्ह्यात ऑनलाईन व्यवहारांमध्ये ११७ जणांना गंडा घातला गेला आहे. यातील दहा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. फेसबुक आणि व्हाॅट्सॲप हॅक करून मॅसेज पाठविण्यात आले आहे.

व्यवहार जपूनच कराअलीकडे प्रत्येकांकडे स्मार्ट फोन आले आहेत. या फोनच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातला जात आहे. मोबाईल कसा वापरावा, यासाठी फोन दुसऱ्याच्या हातात दिला जातो. याच ठिकाणी घात होतो.- अमोल पुरी, प्रभारी अधिकारी, सायबर सेल

वर्षभरात लाखोंची फसवणूक- चोरी, दरोडे, लुटमार यासाठी व्यक्तींना प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची गरज नाही. आता ऑनलाईन दरोडा पडू शकतो. अशाच पद्धतीने लाखो रुपये हॅकरने लाटले आहेत.

ऑनलाईन फ्लाईटचे तिकीट बुक करणे महागात पडले- यवतमाळातील एका ग्राहकाने विदेशात जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट बूक केले. त्यासाठी एक लाख १५ हजार रुपये संबंधितांकडे वळते केले. यानंतर त्याला फ्लाईटचे तिकीट पाठविण्यात आले. मात्र, या तिकिटावर विदेशातील व्यक्तीचे नाव होते. या व्यक्तीने थेट सायबर सेलशी संपर्क साधला. यानंतर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या. एक लाख १५ हजार रुपये परत मिळाले.- मक्याची कणसं खरेदी करण्यासाठी एका शेतकऱ्याने तीन लाख रुपये समोरच्या व्यक्तीच्या खात्यात टाकले. आता हे पैसे तर बँकेत वळते झाले. मात्र, शेतमाल पाठविणारा व्यक्ती ऑनलाईन होता, आता तो दिसत नाही.

ऑनलाईन फसवणूक झाली तर...- फसवणूक झाल्यानंतर तात्काळ लगतच्या ठाण्यात जावून त्याची माहिती संबंधितांना द्यावी, अन्यथा सायबर सेलशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. यामुळे गुन्हेगाराला रोखण्यास मदत होईल.

...तर थोडे सावधानक्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो.आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात्यावर पैसे पाठवा, असे सांगितले जाते. अशावेळी ग्राहकांनी पैसे पाठवू नये.मोबाईल समजत नसल्याने स्क्रीन शेअर करण्यासाठी पुढील व्यक्ती सांगतात. यावेळी स्क्रीन शेअरिंग अप्लिकेशन समोरच्या व्यक्तीच्या हातात दिले जाते. यामुळे आपला पूर्ण व्यवहार समोरच्यांना माहिती होतो.आपल्याला मोफत माहिती मिळावी आणि शेअर बाजार यातून तुमच्या खिशात पैसे यावे, यासाठी गुंतवणूक करा, असे सांगितले जाते. मुळात कुठल्याही बँका सांगत नाही.

 

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी